प्रसिद्ध कोकणी साहित्यिक 'दिलीप बोरकर' यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री

मला उमेदवारी नको व राजकारणही करायचे नाही असे स्पष्ट वक्तव्य गोमंतकीय प्रसिद्ध कोकणी साहित्यिक दिलीप बोरकर यांनी प्रवेशानंतर बोलताना व्यक्त केले.
Famous Konkani writer 'Dilip Borkar' enters in Congress
Famous Konkani writer 'Dilip Borkar' enters in Congress Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात सध्या जे सुरू आहे ते लोक पाहत आहे. त्यामुळे काही काळ राजकारणापासून मी मौन राखले होते मात्र गोवा वाचविण्यासाठी व्यासपीठाची गरज असल्याने निःस्वार्थीपणे काम करण्यासाठी काँग्रेसमध्ये (Congress) आज प्रवेश केला. मला उमेदवारी नको व राजकारणही करायचे नाही असे स्पष्ट वक्तव्य गोमंतकीय प्रसिद्ध कोकणी साहित्यिक दिलीप बोरकर (Famous Konkani writer 'Dilip Borkar') यांनी प्रवेशानंतर बोलताना व्यक्त केले. गोव्याचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी दिलीप बोरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन काँग्रेसमध्ये स्वागत केले.

Famous Konkani writer 'Dilip Borkar' enters in Congress
'एक्शन ईन गोवा' हे डॉ. लोहिया यांचे पुस्तक भावी पिढीसाठी अनुभवांचा खजिना

पणजीतीली काँग्रेस भवनात झालेल्या या कार्यक्रमाला गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा तसेच एम. शेख उपस्थित होते. गोवा वाचवण्यासंदर्भात मी अनेक लेखन केले आहे. हे लेखन करताना मला धमक्याही आल्या होत्या मात्र त्याला न जुमानता ते सुरूच ठेवले होते. गोमंतकिय अस्मिता टिकवण्यासाठी पुढे सरसावलेल्या गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला होता मात्र हा पक्ष भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने मी त्यापासून दूर झालो. राज्यात कितीतरी नवे पक्ष येत आहेत मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निश्‍चय करून या पक्षाला निःस्वार्थीपणे बळकट करण्यास प्रयत्न करण्याचे ठरविले आहे.

Famous Konkani writer 'Dilip Borkar' enters in Congress
गोव्यातील जलसफरी बोटींवर वाढतेय गर्दी

सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस सत्तेवर येण्याची गरज असल्याने गोमंतकियांनी एकजुटीने भाजपविरोधात लढा द्यायला हवा असे मत बोरकर यांनी व्यक्त केले. गोवा वाचविण्याची वेळ आली आहे. राज्याची सत्ता पुन्हा भाजपच्या हाती गेली तर पुन्हा काय होईल हे गोमंतकियांच्या सध्याची स्थिती डोळ्यासमोर आहे. मी युवा चळवळीत असताना गोव्याच्या हितासाठीच लढत होतो. पुन्हा एकदा गो वाचविण्यासाठी आता काँग्रेसमधून उतरलो आहे. सत्ताधारी आमदार व मंत्र्यांना संपत्ती जमा करायची आहे त्यातच त्यांचा स्वार्थ आहे. त्यामुळे लोकांपर्यंत जाण्यासाठी अधिकृतपणे प्रवेश करून काँग्रेसचे व्यासपीठ मी स्वीकारले, असे ते म्हणाले. काँग्रेसमधून काही आमदार फुटून इतर पक्षात गेले यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता बोरकर म्हणाले, त्यांना पक्ष बळकट करायचा नव्हता तर त्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा होता. त्यामुळे राज्यात राजकारण स्वार्थाचे झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com