Goa Politics: काँग्रेस सत्तेवर आली तरच खाणी सुरू होतील...

विद्यमान भाजप सरकार फक्त निवडणुकीसाठी खाणींच्या प्रश्नाचा वापर करत असल्याचा दावा (Goa Politics)
गोवा प्रदेश कॉँग्रेससचे प्रवक्ते ट्रॉजन डीमेलो व महादेव खांडेकर (Goa Politics)
गोवा प्रदेश कॉँग्रेससचे प्रवक्ते ट्रॉजन डीमेलो व महादेव खांडेकर (Goa Politics) दैनिक गोमन्तक

Goa Politics: भारतीय जनता पक्षाचे सरकार (BJP Govt.) सत्तेवर असताना गोव्यातील खाणी सुरू करणे कदापि शक्य नाही. मात्र गोव्यात काँग्रेसचे सरकार (Goa Pradesh Congress) सत्तेवर आले तरच राज्यातील खाणी सुरू होतील. असा दावा आज काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते (Congress Spoke person) ट्रोजन डिमेलो व प्रवक्ते महादेव खांडेकर यांनी पणजी येथील काँग्रेस कार्यालयात आज बोलताना वरील दावा केला. यावेळी बोलताना डिमेलो म्हणाले की माजी गृहमंत्री व गोवा काँग्रेसचे निवडणूक मुख्य निरीक्षक पी चिदंबरम यांनी यापूर्वीच कायदा तज्ञांचे सहकार्य घेऊन गोव्यातील खाणी सुरू काँग्रेस सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार काँग्रेसचे सरकार येताच गोव्यातील खाणी सुरू करण्यात येतील, असे डिमेलो म्हणाले.

महादेव खांडेकर यानी गोव्यातील खाणी (Goa Mining) सुरू होणे कठीण असल्याचे सांगत फक्त काँग्रेसच त्यावर तोडगा काढू शकतो. विद्यमान भाजप सरकार फक्त निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) खाणींच्या प्रश्नाचा वापर करत असल्याचा दावा त्यांनी केला व मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खाण अवलंबितांना सत्य गोष्ट सांगण्याची मागणी केली.

गोवा प्रदेश कॉँग्रेससचे प्रवक्ते ट्रॉजन डीमेलो व महादेव खांडेकर (Goa Politics)
Goa Politics: मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार निर्लज्ज; काँग्रेस अध्यक्ष चोडणकर

कोविड नियमावली मागे घेणे मुर्खपणा - अमरनाथ पणजीकर

गणेश चतुर्थीसाठी भाजप सरकारने जारी केलेली कोविड नियमावली मागे घेणे हा भाजप सरकारच्या मुख्यमंत्री डॉं. प्रमोद सावंतांचा मुर्खपणा आहे.सपशेल अपयशी ठरलेले तसेच भ्रष्ट, अकार्यक्षम व असंवेदनशील भाजप सरकार आता माघारी फिरण्याच्या तयारीत असुन, सरकारचे घडे भरले आहेत अशी जोरदार टीका कॉंग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

काल सरकारनेच जारी केलेल्या कोविड नियमावलीवर प्रतिक्रीया देताना डॉ. प्रमोद सावंतानी आपलेच हसे करुन घेतले. डोके नसलेल्या भाजप सरकारवर त्यानीच जारी केलेली नियमावली काही तासातच मागे घेण्याची पाळी येणे यावरुन सरकारचा मुर्खपणा स्पष्ट होतो. असेही पणजीकर यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com