गोमंतक भंडारी समाजाला भेट देणारे केजरीवाल पहिले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघातील लोकांची काळजी घेऊ शकत नसतील तर ते संपूर्ण राज्‍याची काळजी कशी घेणार:अरविंद केजरीवाल
Goa Politics Arvind Kejriwal
Goa Politics Arvind Kejriwal Dainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये: आम आदमी पक्षाचे (AAP) सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejariwal) यांनी आज म्हाऊस आणि करमळी बद्रुक ग्रामस्थांशी संवाद साधला आणि जमिनीच्या मालकीचे आश्वासन दिले. गोव्यातील खाण उद्योग बंद (Goa Mining) पडला आहे. 2012 पासून तब्‍बल 60 हजार कुटुंबे यामुळे बाधित आहेत. बहुतांश खाण अवलंबित कुटुंबे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात येतात. जर मुख्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघातील लोकांची काळजी घेऊ शकत नसतील तर ते संपूर्ण राज्‍याची काळजी कशी घेणार, असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला व ते सपशेल अपयशी ठरल्‍याचा आरोप केला.

Goa Politics Arvind Kejriwal
गोव्यातील खाण कंपन्यांना का घ्यावी लागली केंद्र सरकारकडे धाव!

वरील दोन्‍ही गावांतील ग्रामस्‍थांनाही जमीन मालकीची प्रश्‍‍न गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून सतावत आहे. तो सोडविण्‍यासाठी ग्रामस्‍थांनी वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजविले, परंतु काही उपयोग झाला नाही. मात्र आता केजरीवाल यांनी दिलेल्‍या आश्‍‍वासनामुळे त्‍यांच्‍या अपेक्षा वाढल्‍या आहेत.

केजरीवाल यांनी सोमवारी खाण अवलंबित कुटुंबांशीही संवाद साधला. निवडणुकीनंतर राज्‍यात आमचे सरकार सत्तेवर आल्‍यास खाण क्षेत्रात रोजगारामध्ये प्राधान्य देणारा कायदा आम्‍ही अंमलात आणू. तसेच अवघ्‍या सहा महिन्यांत खाणी सुरू करू, असे आश्‍‍वासन त्‍यांनी दिले. निवडणुकीपूर्वी अन्‍य पक्ष एसीमध्ये बसून खोटी आश्वासने देतात. आम आदमी पक्ष तसा नाही. आपण खाण अवलंबित कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या समस्‍या ऐकल्या, असे ते म्‍हणाले.

Goa Politics Arvind Kejriwal
गोव्यातील काजूगरांना आले ‘अच्छे दिन’

आपण अनेकदा ऐकले आहे की गोवा सरकार परप्रांतीय लोकांना सरकारी कंत्राटे देते. हे लोक त्यांची मशिनरी आणि कामगार आणतात. त्‍यामुळे स्थानिकांना संधी मिळत नाही. आमचा पक्ष सत्तेत आल्यास आम्ही 80 टक्के आरक्षण देऊ. प्रत्येक खासगी क्षेत्रात स्थानिकांना नोकऱ्या देऊ. तसेच खाण उद्योगासाठी स्वतंत्र कायदा करू. खाण अवलंबित कुटुंबांसाठी आम्ही खाण क्षेत्रात रोजगार राखून ठेवू, असे केजरीवाल म्‍हणाले.

पाळी येथे आम्रे कुटुंबासोबत केले जेवण

म्हावशी आणि करमळी बद्रुक ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर केजरीवाल यांनी साखळी मतदारसंघातील पाळी या गावात सदगुरु आम्रे कुटुंबासोबत जेवणाचा आस्‍वाद घेतला. दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेल्‍या केजरीवाल यांना काल रविवारी गोमंतक भंडारी समाजाच्या मुख्य कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. ही भेट देणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले. आज त्‍यांनी खाण अवलंबित कामगारांची भेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com