Goa Police : बदल्या झालेल्‍या पोलिसांमध्‍ये खदखद!

आदेश कागदावरच : काहींना ‘रिलिव्ह’ मिळेना तर काहींना बनायचंय ‘सरकारी जावई’
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police : पोलिस खात्यात कॉन्स्टेबल ते उपनिरीक्षकांच्‍या बदल्यांचे आदेश काढले जातात. या बदल्यांची कार्यवाही त्वरित व्हावी असे त्या आदेशात नमूद करण्यात आलेले असते. मात्र प्रत्यक्षात बदल्या होऊनही अर्ध्याहून अधिक पोलिस तेथेच कार्यरत असतात. काहींना पूर्वीच्‍याच जागी ठाण मारून बसायचे असते तर बदली पोलिस आल्याशिवाय काहींची सुटका (रिलिव्ह) होत नसते. त्‍यामुळे या दुसऱ्या गटातील पोलिसांची सध्‍या जास्‍त खदखद सुरू आहे.

कारण बदली होऊनही त्‍यांना बदलीच्या ठिकाणी जात येत नाहीय. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात नाराजी पसरली असून काहींवर तर नाईलाजाने राजकारण्यांच्‍या घराचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.

काही पोलिस उपनिरीक्षकांची बदली होऊनही महिनोन्‌महिने त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडले जात नाही. अनेक पोलिस स्थानकांमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. पणजी पोलिस स्थानकात तर एकच महिला कर्मचारी आहे. ज्यांची येथे बदली झाली आहे, त्या येण्यास तयार नाहीत. त्यातील काहींनी आपल्या बदल्या रद्द करून घेतल्या आहेत. त्याचा परिणाम पोलिस स्थानकातील कामावर होत आहे. या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना पाळ्यांमध्ये काम करायला नको.

Goa Police
Goa News - वेलिंग प्रियोळ ग्रामसभेत गोंधळ | Gomantak TV

त्यांना सकाळी ड्युटी करून संध्याकाळी घरी जायला हवे. त्यामुळे त्यांचा कल साईड पोस्‍टिंगच्या ठिकाणी काम करण्याचा असतो. अनेकदा पोलिस स्थानकाला शेजारी असलेल्या पोलिस स्थानकातून महिला पोलिसांना बोलविण्याची वेळ येते.

गेल्या तीन महिन्यांत अनेक पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. काहींना रिलिव्ह करण्यात आले तर काहींना अजूनही रिलिव्ह करण्यात आलेले नाही. काहीजण निवृत्तीकडे झुकलेले आहेत. त्यांनी पोलिस स्थानकाऐवजी इतर ठिकाणी बदली घेतली आहे. मात्र त्यांना पोलिस नियंत्रण कक्षाच्या वाहनांवर रात्रीच्या ड्युटीवर पाठवण्याचे प्रकार घडत आहेत.

किनारपट्टी परिसरात असते ‘चांदीच चांदी’

किनारपट्टी परिसरातील पोलिस स्थानकांवर अनेक पोलिस कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले आहेत. कारण तेथे त्‍यांना मलिदा चांगला मिळतो. तसेच दररोज खिसाही भरतो. बदल्या झाल्या तर ते राजकारण्यांकडे धाव घेऊन त्या रद्द करून घेतात किंवा पोलिस निरीक्षकावर राजकारण्यांकडून दबाव आणून आपल्‍याला रिलिव्ह करायला सांगू नका असा तगादा लावतात. काही पोलिसांना बदलीच्या ठिकाणी जायचे असते.

Goa Police
Panjim Municipal Corporation: महानगरपालिकेचा 'तो' दावा फोल; मात्र उपमहापौर म्हणतात, 'पहिल्या पावसाने...

त्यासाठी ते वरिष्ठांना वारंवार विनवण्याही करतात. परंतु ‘तुझ्‍याजागी बदली झालेला पोलिस कर्मचारी येऊ दे, मगच तुझी सुटका करतो’ असे वरिष्ठांकडून सांगितले जाते. बदल्यांचा आदेश निघून महिना झाला तरी काहींना बदली झालेल्या जागी सोडले जात नाही. त्यामुळे बिनतारी संदेश सर्व पोलिस स्थानकांना पाठविले जातात. मात्र त्याचाही काहीच परिणाम होत नाही.

पोलिसांच्या बदल्या होऊनही काहींना रिलिव्ह करण्यात आलेले नाही हे माहीत आहे. बदल्या झालेल्या पोलिसांना रिलिव्ह करण्यासाठी बिनतारी संदेश पाठविण्यात आले असून त्याचा आढावा घेतला जाणार आहे. काही स्थानकांवर आधीच पोलिस कर्मचारी कमी असल्याने बदली झालेल्या पोलिसांना तेथील निरीक्षक सोडण्याच्‍या कामात चालढकलपणा करत असल्याचे दिसून आले आहे. दोन्‍ही पोलिस अधीक्षकांकडून माहिती घेतली जाईल.

- शेखर प्रभुदेसाई (अधीक्षक, पोलिस मुख्यालय)

महिला पोलिसांची संख्‍या खूपच कमी

जुने गोवे पोलिस स्थानकात दोन महिला उपनिरीक्षक आहेत तर राजधानी पोलिस स्थानकात एकच महिला उपनिरीक्षक आहे. पणजीत नेहमीच आंदोलने, धरणे, मोर्चा सुरूच असतात. अशा वेळी आंदोलकांना आवरण्‍यासाठी पोलिस निरीक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते.त्यासाठी ते वरिष्ठांना वारंवार विनवण्याही करतात. परंतु ‘तुझ्‍याजागी बदली झालेला पोलिस कर्मचारी येऊ दे, मगच तुझी सुटका करतो’ असे वरिष्ठांकडून सांगितले जाते. बदल्यांचा आदेश निघून महिना झाला तरी काहींना बदली झालेल्या जागी सोडले जात नाही. त्यामुळे बिनतारी संदेश सर्व पोलिस स्थानकांना पाठविले जातात. मात्र त्याचाही काहीच परिणाम होत नाही.

Goa Police
Panjim Smart City : पणजी तुंबल्याची ‘स्मार्ट झलक’ | पणजीत मुसळधार! 24 तासांत 202 मिमी पावसाची नोंद

पोलिसांच्या बदल्या होऊनही काहींना रिलिव्ह करण्यात आलेले नाही हे माहीत आहे. बदल्या झालेल्या पोलिसांना रिलिव्ह करण्यासाठी बिनतारी संदेश पाठविण्यात आले असून त्याचा आढावा घेतला जाणार आहे. काही स्थानकांवर आधीच पोलिस कर्मचारी कमी असल्याने बदली झालेल्या पोलिसांना तेथील निरीक्षक सोडण्याच्‍या कामात चालढकलपणा करत असल्याचे दिसून आले आहे. दोन्‍ही पोलिस अधीक्षकांकडून माहिती घेतली जाईल.

- शेखर प्रभुदेसाई (अधीक्षक, पोलिस मुख्यालय)

महिला पोलिसांची संख्‍या खूपच कमी

जुने गोवे पोलिस स्थानकात दोन महिला उपनिरीक्षक आहेत तर राजधानी पोलिस स्थानकात एकच महिला उपनिरीक्षक आहे. पणजीत नेहमीच आंदोलने, धरणे, मोर्चा सुरूच असतात. अशा वेळी आंदोलकांना आवरण्‍यासाठी पोलिस निरीक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com