Helpline: सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड तक्रारीसाठी लवकरच गोवा पोलिसांची हेल्पलाईन

Goa Police Helpline
Goa Police HelplineDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात सायबर क्राईम (Cyber Crime), ऑनलाईन फ्रॉडचे (Online Fraud) प्रकार वाढले आहेत. अशा प्रकरणांची तात्काळ नोंद आणि नागरिकांना मदत मिळावी यासाठी गोवा पोलिस लवकरच एक हेल्पलाईन सुरू करणार आहेत (Goa police to soon have helpline to check online Frauds, cyber crime). या माध्यमातून नागरिकांना तात्काळ मदत मिळू शकते.

Goa Police Helpline
Dual Citizenship: गोव्यातील दुहेरी नागरिकत्वाचा अहवाल दोन वर्षांत सादर करा

मिळालेल्या माहितीनुसार गोवा पोलिसांचे हेल्पलाईन सुरू करण्यासंबधीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. आजकाल ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वाढल्या आहेत. लाईट बिल, फोनचे बिल, अनेक खोट्या स्किम, योजना, गुंतवणूकीचे पर्याय सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. अशी घटना घडताच तात्काळ पोलिसांच्या मदतीने आर्थिक नुकसान (Financial cheating) वाचविता येऊ शकते.

मागील काही दिवसांपासून ईलेक्ट्रिक बिल (Electric Bill) भरण्यासंधर्भात एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. त्याच खाली एक मोबाईल नंबर आणि लिंक देण्यात आली आहे. बिलाचा भरणा न केल्यास विद्दुत पुरवठा खंडित होईल अशा आशयाचा तो मेसेज आहे. दरम्यान, नागरिकांना अशा कोणत्याही मेसेजला बळी पडू नये. कुणालाही आपल्या बँक संबधित माहिती किंवा कोणताही ओटीपी शेअर करू नये (Dont Share OTP). असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com