Goa Police: कारवाईचा धडाका सुरुच; आठ महिन्यात 114 किलो अमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले
Drugs Case
Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा पोलिसांनी अमली पदार्थाविरोधातील आपली कारवाई वेगाने सुरु केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आठ महिन्यांत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 114 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच दर आठवड्याला सरासरी तीन ठिकाणी छापेमारी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(Goa police seized 114 kg of drugs in eight months)

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गेल्या 8 महिन्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, एलएसडी, एमडीएमए, एक्स्टसी गोळ्या, पावडर, कोकेन, चरस तेल, हेरॉइन आणि गांजा यांचा समावेश आहे, हे सर्व एकूण 91 किलोपेक्षा जास्त वजनाचे आहेत. त्यामुळे राज्यात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Drugs Case
Goa Accident Cases: गोव्यातील अपघातांचे प्रमाण कमी होईना!

अटक करण्यात आलेले बहुतेक आरोपी परप्रांतीय

गोवा राज्यात अमली पदार्थ आयात करत बहुतेक पार्ट्यांमध्ये वापरले जातात. या कारवायांमध्ये अटक करण्यात आलेले बहुतांशी आरोपी इतर राज्यातील आहेत. तसेच जप्त करण्यात आलेल्या बहुतेक अंमली पदार्थांमध्ये गांजा आणि चरस यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांंनी दिली.

Drugs Case
Goa Police: गोव्यातील चोपडे पुलावरुन उडी घेतलेल्याचा शोध लागेना!

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना महामारीनंतर राज्यातील पर्यटनाने पुन्हा वेग घेतल्याने ड्रग्ज देखील राज्यात येऊ लागले आहेत. यावर आळा घालण्यासाठी कारवाई सुरु असुन राज्यात दर आठवड्याला सरासरी तीनहून अधिक अंमली पदार्थ प्रकरणी छापेमारी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com