गोवा पोलिसांनी एटीएस फोर्ससाठी केली रायफल्स खरेदी

Goa police procures Made in India snippers for ATS force
Goa police procures Made in India snippers for ATS force
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा पोलिस खात्याने (Goa Police Department)अतिरेकीविरोधी  पथकासाठी (ATS) अत्याधुनिक पिस्तुले व रायफल्स(Rifles) खरेदी केली आहेत. या पथकातील 45 पोलिसांनी अत्याधुनिक हत्यारे हाताळण्याच्या प्रशिक्षणासाठी हरियाणा येथे नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) संस्थेत तीन महिन्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या(Crime Branch) अधिकाऱ्यांनी दिली. (Goa police procures Made in India snippers for ATS force)

गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात. गोवा हे अतिरेक्यांचे लक्ष्य असल्याने गोव्यात अतिविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होता. या पथकातील पोलिसांना कमांडो प्रशिक्षण देण्यात आले आहे. या नव्याने खरेदी करण्यात आलेल्या पिस्तुले व बंदुका हाताळण्याचे प्रशिक्षण या 45 पोलिस कमांडोना देण्यात येणार असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

या अत्याधुनिक हत्यारामुळे तसेच कमांडोना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे गोव्यात अतिरेक्यांनी हल्ला केल्यास त्याचा सामना करण्यास गोवा पोलिसातील अतिरेकीविरोधी पथक नेहमीच तत्पर असेल. पोलिस खात्यातील इतर विभागातील पोलिसांना अतिरेकीविरोधी पथकामध्ये काम करण्याची इच्छा असल्यास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते.  सुमारे 95 पोलिसांनी इच्छा व्यक्त करून अर्ज केले होते. या पोलिसांची इच्छा, शारीरिक चाचणीनुसार 45 जणांना या कमांडो प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 

या सर्व 45 पोलिसांनी वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात पूर्व कमांडो प्रशिक्षण केले आहे. अतिरेकीविरोधी पथकामध्ये 90 कमांडो आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आणखी 35 जणांचा समावेश होणार आहे. ज्या पोलिसांची कमांडोसाठी निवड झाली आहे ते कोविड महामारीमुळे विविध ठिकाणी कामाला आहे त्यामुळे या पोलिसांना कमांडो प्रशिक्षणासाठी हरियाणा येथे पाठवण्यास उशीर होत आहे. 

जगात कोठेही अतिरेकी हल्ले झाले तरी गोव्याला अधुनमधून अतिरेक्यांकडून धमक्याचे सत्र हे सुरूच असते. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने अनेक वर्षापासून अतिरेक्यांचे लक्ष्य आहे. अतिरेकीविरोधी पथकामध्ये कमांडो संख्या वाढल्यास सुरक्षिततेची ताकदही वाढणार आहे. गेल्या काही काळात काही अतिरेकी गोव्यात वास्तव्य करूनही गेले आहेत तर काहींना गोवा पोलिसांनी गजाआडही केले आहे. त्यामुळे अतिरेकीविरोधी पथक हे अधिक दक्ष तसेच अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असण्याची गरज आहे.  सध्या पथकामध्ये असलेल्या कमांडोंची शारीरिक प्राविण्य व तंदुरुस्तीची चाचणी हल्लीच घेण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com