Arrest
ArrestDainik Gomantak

जपानी पर्यटकाची लुबाडणूक प्रकरण! गुन्हा दाखल होताच दोन दिवसांत तिघांना अटक

पर्यटकाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत मांडली होती कैफियत
Published on

Japanese Tourist : काही दिवसांपूर्वी एका जापानी नागरिकाची गोव्यात फसवणुक झाल्याची घटना उघडकीस आली होती. फसवणुक झाल्याचा खुलासा हा जापानी नागरिकाने ट्विट करत केला होता. त्यानंतर जपानी नागरिकाने हणजूण पोलिसांत ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली होती.

Arrest
Goa Electricity: झळ सोसावीच लागेल; ढवळीकर म्हणतात, वीज दरवाढ अटळ

अखेर दोन महिन्यानंतर याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी रॉनी, राजू व इतर दोन अज्ञात व्यक्ती अशा चार संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला. दरम्यान, याप्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

एक जपानी पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी 29 डिसेंबर रोजी आला होता. यावेळी जापानी नागरिकाला काही जणांनी आपण पोलिस असल्याचे भासवत वाडी शिवोली येथील फ्लॅटवर नेले. जापानी नागरिकाला त्यांनी दमदाटी व मारहाण करत त्याची 9.43 लाखांची लुबाडणूक केली. यानंतर त्याला धमकी देत गोव्याच्या बाहेर पाठवण्यात आले.

Arrest
Goa Football: विराटकडून गोव्यात नव्या प्रोजेक्टची घोषणा, FC Goa सह करणार 'हे' काम

ही घटना डिसेंबरमध्ये घडली होती. जपानी पर्यटकाने ट्विटवर पोस्टमधून त्याची कैफियत मांडली. माझे पैसे परत मिळावेत यासाठी मला पाठिंबा द्या, अशी विनंती त्याने पोस्टमधून केली होती. या जपानी पर्यटकाने ज्या व्यक्तींनी त्याला लुटले त्या संशयितांचे फोटोही शेअर केले.

यानंतर उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी संबंधित जपानी व्यक्तीला मेलद्वारे तक्रार करण्यास सांगितले तसेच संपर्क क्रमांकही मागितला तसेच याबाबत चौकशी करू, असे आश्वासनही त्यांनी पर्यटकाला दिले होते.

वाल्सन यांच्या ट्विटला उत्तर देताना जपानी नागरिकाने, दीड महिन्यांपासून पोलिसांना ई-मेल पाठवत असल्याचे म्हटले आहे. अनेकदा सांगुनही एफआयआर नोंदवली नाही, असेही त्याने म्हटले होते.

अखेर दोन महिन्यानंतर रविवारी याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी रॉनी, राजू व इतर दोन अज्ञात व्यक्ती अशा चार संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला. दरम्यान गुन्हा नोंद दाखल होताच दोन दिवसांत तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com