Goa Matka Cases: मटका, बेटिंगविरोधात 414 गुन्‍हे नोंद! विधानसभेत माहिती उघड; LOP आलेमाव यांनी विचारला प्रश्न

Goa IPL Betting: गेल्‍या साडेपाच वर्षांत राज्‍यात मटक्‍याबाबतचे ३७५ आणि आयपीएल बेटिंगसंदर्भातील ३९ असे मिळून ४१४ गुन्‍ह्यांची नोंद विविध पोलिस स्‍थानकांमध्‍ये झालेली आहे.
Crime
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्‍या साडेपाच वर्षांत गोवा पोलिसांनी मटक्‍यासंदर्भात ३७५ आणि आयपीएल बेटिंगबाबतचे ३९ असे एकूण ४१४ गुन्‍हे नोंद केल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्‍या लेखी प्रश्‍नाला उत्तरातून दिली आहे.

गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यात आयपीएल बेटिंग आणि मटक्‍यासंदर्भातील किती गुन्‍ह्यांची नोंद झाली, यात उच्च पदावरील अधिकारी लाच घेत असल्‍याचे प्रकार आढळून आलेले आहेत का, राज्‍यात मटका कायदेशीर आहे का, असे प्रकार रोखण्‍यासाठी कोणत्‍या उपाययोजना राबवण्‍यात येत आहेत, असे प्रश्‍न आलेमाव यांनी विचारले होते.

Crime
Goa Casino: गोव्यात 'जुगारी शहर' झाल्यास पर्यटक निसर्ग सोडून कॅसिनोत जातील, 'मटका आणि प्रॉबेबिलिटी’ सारख्या डिग्री देता येतील..

त्‍यावर गेल्‍या साडेपाच वर्षांत राज्‍यात मटक्‍याबाबतचे ३७५ आणि आयपीएल बेटिंगसंदर्भातील ३९ असे मिळून ४१४ गुन्‍ह्यांची नोंद विविध पोलिस स्‍थानकांमध्‍ये झालेली आहे. यातील काही प्रकरणांचा अधिक तपास पोलिसांकडून करण्‍यात येत आहे. अशा प्रकरणांत उच्च पदांवरील अधिकाऱ्यांकडून लाच घेतल्‍याचे प्रकरण आढळलेले नाही, असे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी म्‍हटले आहे.

Crime
Goa Crime: दक्षिण गोव्‍यात 'मटका खुलेआम', केवळ ३१८ प्रकरणांची नोंद; 'कडक कारवाई'च्या आदेशाला वाटाण्‍याच्‍या अक्षता

‘बेटिंग’वर कारवाई सुरूच!

राज्‍यात मटक्‍यावर बंदी आहे. तरीही छुप्‍या पद्धतीने मटका घेणाऱ्यांविरोधात तक्रारी नोंद झाल्‍यानंतर पोलिसांकडून त्‍यांच्‍यावर छापे टाकले जातात. आयपीएल काळात बेटिंग घेणाऱ्यांवर कारवाई करण्‍यासाठी पोलिसांकडून वारंवार हॉटेल्स, व्‍हिलांवर छापे टाकण्‍यात येत असल्‍याचेही मुख्‍यमंत्र्यांनी उत्तरात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com