Goa Police: हणजुणेत 1 लाखाचे ड्रग्ज जप्त; राजस्थानच्या युवकास अटक

गांजा, चरस, केटीएम दुचाकी जप्त
Goa Police
Goa Police Dainik Gomantak

Goa Police: एकीकडे गोवा ख्रिसमससाठी सज्ज झालेला असताना ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला हणजुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे. यात हणजुणेतून राजस्थानच्या युवकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक लाख रूपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

हणजुणे पोलिसांनी शनिवारी ड्रग्ज तस्करीविरोधात ही कारवाई केली. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार हणजुणेत एक व्यक्ती अमली पदार्थांसह येणार असल्याचे कळले होते. त्यामुळे पोलिसांनी येथे सापळा रचला होता.

संबंधित तरूण येताच पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Goa Police
गोव्यातील मंदिरांमध्ये नवीन वर्षापासून लागू होणार ड्रेस कोड; मिनी स्कर्ट, मिडी, शॉर्ट्स, स्लीव्हलेस टॉप, जीन्सवर बंदी

हणजुणेतील स्प्लॅश डाऊन वॉटर पार्कजवळ रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात देवेंद्रनाथ लक्ष्मीकांत गोसावी (वय 28) याला अटक करण्यात आली. तो सध्या कानका बांध, बार्देश येथे राहतो. तर तो मूळचा राजस्थानचा आहे.

त्याच्याकडून 50000 रूपये किंमतीचा गांजा आणि 50000 रूपये किंमतीचे चरस असा एक लाख रूपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

त्याची केटीएम ड्यूक (GA 04 J 4999) ही दुचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

छापा टाकलेल्या पथकात पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई, पोलिस उपनिरीक्षक आशिष परब, कॉन्स्टेबल महेंद्र मांद्रेकर, रूपेश आजगावकर, आदर्श नागेकर, आमीर फडते यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com