Goa Police: प्रशासनाची मोठी कारवाई; पाच वर्षांत तब्बल 127 पोलिस निलंबित

पोलिस खात्यात गेल्या पाच वर्षांत (2017 ते 2022) या काळात 127 पोलिसांविरुद्ध विविध आरोपाखाली आरोप ठेवून निलंबित करण्यात आले आहे.
Goa Police |
Goa Police | Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Police: पोलिस खात्यात गेल्या पाच वर्षांत (2017 ते 2022) या काळात 127 पोलिसांविरुद्ध विविध आरोपाखाली आरोप ठेवून निलंबित करण्यात आले आहे. यातील एका उपनिरीक्षकासह तिघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

सध्या एका निरीक्षकसाह 11 जण निलंबनाखाली आहे. त्यामध्ये निरीक्षक नोलास्को रापोझ यांचा समावेश आहे. निलंबन केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू असताना एक किंवा सहा महिन्यांत त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येऊन ‘साईडपोस्टींग’ देण्यात येत.

निरीक्षक नोलास्को रापोझ याला निलंबित करून वर्ष उलटले तरी त्याचे निलंबन मागे घेण्यात आलेले नाही. गेल्या पाच वर्षांत 127 पोलिस कर्मचारी निलंबित झाले. त्यामध्ये 3 निरीक्षक, 10 उपनिरीक्षक, 6 सहाय्यक उपनिरीक्षक, 26 पोलिस हवालदार तर 82 कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.

अद्याप एकही बडतर्फ नाही

पाच वर्षांतील आतापर्यंत निलंबित झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक जणांची चौकशी पूर्ण झाली आहे व त्यात त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. उर्वरित 30 टक्के पोलिसांची चौकशी सुरू आहे.

आतापर्यंत निलंबित झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी होऊन कोणीही बडतर्फ झालेला नाही. त्यांना सेन्सॉर किंवा समज देऊन पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

Goa Police |
Tank In Mormugao: अमोनिया टाकी म्हणजे ‘टाइम बाँब’

सरकारची फसवणूक, कर्तव्यात कसूर

पाच वर्षांत सेवेतून बडतर्फ केलेल्यांत प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक रितेश फळदेसाई, कॉन्स्टेबल परेश तळकर व पोलिस हवालदार शांबा पेडणेकर याचा समावेश आहे. रितेश व शांबा या दोघांनी नोकरीसाठी शैक्षणिक बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

परेश हा खात्याला कोणताही माहिती न देता रजेवर गेला होता. त्यामुळे निष्काळजीपणाचा ठपका ठेवून त्याला काढलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bicholim
Goa Police Action Against Five Policemen
Goa Government Spending
Goa Police Torture Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com