गुन्हे शाखा पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या वतीने कळंगुट भागात कार्यरत असलेल्या अवैध स्पा आणि मसाज पार्लर विरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आज विशेष मोहिमेंतर्गत परिसरातील विविध स्पा आणि पार्लर यांना भेट देत त्यांच्याकडे आरोग्य खात्याचा परवाना आहे का? याची पडताळणी केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी गुरूवारी दुपारी कळंगुट येथील भागातील स्पा आणि मसाज पार्लर यांची पाहणी केली. तपासणी दरम्यान, पोलिसांनी एकूण 14 मसाज पार्लरची पाहणी केली.
यामध्ये ब्ल्यु तेरा स्पा आणि सलोन या पार्लरकडे आरोग्य खात्याचा वैध परवाना नसल्याचे पोलिसांना अडळून आले. पोलिसांनी स्पा विरोधात अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. पोलिसांनी 29A प्रमाणे स्पा विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
कळंगुटमध्ये सलूनच्या नावाखाली बेकायदेशीर मसाज पार्लर
कळंगुटमध्ये सलूनच्या नावाखाली बेकायदेशीर मसाज पार्लर चालवले जात असल्याचे दिसून आले. पोलिसांना याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी भेट देत पोलिसांनी सलून सील केले आहे.
एका भाड्याच्या रूममध्ये सलून टाकण्यात आले होते, मात्र, त्यानंतर आतमध्ये रूम्स तयार करण्यात आल्या. संशय आल्याने मालकांनी याबाबत तक्रार केली.