Goa Crime: बनावट दस्तऐवज प्रकरण! सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल; दोघा संशयितांची बँक खाती पोलिसांनी गोठवली

Penha de France Crime: पेन्ह दी फ्रान्स पंचायत क्षेत्रातील जमिनीचे बनावट दस्तऐवज (बक्षीसपत्र) तयार केल्याबद्दल पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने व्हिटोरियो जोस वेल्हो आणि त्याची पत्नी मरीनेला वेल्हो यांच्यासह इतर सहकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
Goa Latest Crime News
Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

Penha de France Land Fake Document Crime News

पणजी: पेन्ह दी फ्रान्स पंचायत क्षेत्रातील जमिनीचे बनावट दस्तऐवज (बक्षीसपत्र) तयार केल्याबद्दल पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने व्हिटोरियो जोस वेल्हो आणि त्याची पत्नी मरीनेला वेल्हो यांच्यासह इतर सहकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. गुन्हे शाखेने यापूर्वीच व्हिटोरियोला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी व्हिटोरियो आणि गंगाप्रसाद कुशवाह यांची बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आल्तिनो-पणजी येथील मारिया व्हायोलेंट सेलिना सुशीला डी-विसिरा वेल्हो आणि फर्नांडो जोस डी मातोस सिक्वेरा आल्मेदा यांनी ही तक्रार दिली आहे.

संशयित व्हिटोरियो वेल्हो, पत्नी मरिनेला वेल्हो, पी. पी. शिरोडकर (वय ३०, रा. कुएल्होवाडो, आल्त-पर्वरी), अरुणकुमार गुप्ता (रा. अशोक टॉवर, गोमतीनगर, लखनौ, उत्तर प्रदेश), गंगाप्रसाद कुशवाह (रा. बसवा इंटरनॅशनल स्कूलजवळ, द्वारका सेक्टर, दक्षिण-पश्चिम दिल्ली), आणि अनुराग कुशवाह (रा. उपेंद्र नगर कॉलनी, वाराणसी, उत्तर प्रदेश) यांनी जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून बार्देश मामलेदार कार्यालयात सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Goa Latest Crime News
Tanvi Vasta Case: '१० टक्‍के कमिशन'ने सुरूवात, तपासात उलगडला तन्वीचा फसवणुकीचा पॅटर्न, घोटाळ्यांची संख्या 25 वर

सामंजस्य कराराचीही होणार चौकशी

यासंदर्भात गुन्हे शाखेने मुख्य आरोपी व्हिटोरियो आणि गंगाप्रसाद कुशवाह यांना नोटीस बजावून त्यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. जमिनीचे बनावट गिफ्ट सेल डीड तयार करण्यात आणि त्यानंतरच्या सामंजस्य करारात गंगाप्रसाद कुशवाह यांची भूमिका तपासली जात आहे. दोन्ही आरोपींची बँक खाती गोठवली असून, सर्व आरोपींची भूमिका समजून घेण्यासाठी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com