Goa Government Job: सरकारी नोकरीचे आमिष दाखवत भामट्याने लाटले 40 लाख; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Goa Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येतायेत. गोव्यात तरुणांचा सरकारी नोकऱ्यांप्रती असलेल्या आकर्षणाचा फायदा काही भामटे घेतायेत.
Goa Government Job: सरकारी नोकरीचे आमिष दाखवत भामट्यानं लाटले 40 लाख; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येतायेत. गोव्यात तरुणांचा सरकारी नोकऱ्यांप्रती असलेल्या आकर्षणाचा फायदा काही भामटे घेतायेत. असाच काहीसा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी नोकरी आमिष दाखवून अनेक तरुणांना गंडवून तब्बल 40 लाख लाटले असल्याची तक्रार फोंडा पोलिस ठाण्यात प्रकाश मुंकुद राणे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आली. यावर तातडीने फोंडा पोलिसांनी कारवाई करुन राणे याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांनी त्याला पणजी पोलिसांकडे सुपुर्द केले.

मंत्र्यांशी ओळख!

मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा गावस यांनी आरोपी प्रकाश राणे याची ओळख फिर्यादी उर्फ शीतल श्रीधर आश्वेकर यांच्याशी करुन दिली होती. दरम्यान राममे याने आपण निवृत्त पशु वैद्यकीय डॉक्टर असल्याची माहिती देत अनेक मंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगितले होते. त्याने आश्वेकर यांच्या मुलाला अबकारी खात्यात निरीक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून 13 लाख उकळले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयित राणेविरुद्ध भादंवि कलम 403 व 420 अन्वये गुन्हा नोंद करत अटक केली.

Goa Government Job: सरकारी नोकरीचे आमिष दाखवत भामट्यानं लाटले 40 लाख; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
Goa Government Job: घरबसल्या येईल सरकारी नोकरीचा कॉल; गोवा सरकारची भन्नाट योजना, अशी करा नोंदणी

बँकिंग फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक

काही दिवसांपूर्वी, बँकिंग फसवणुकीवर महत्वाची कार्यवाही करताना म्हापसा पोलिसांनी मोहम्मद हसिम आणि मुश्ताक अहमद या दोन परप्रांतीयांना अटक केली. या दोघांवर ग्राहकांचा खासगी डेटा चोरल्याचा आणि बँकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला. दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील या दोघांनी खोटी ओळखपत्रं वापरुन ग्राहकांची फसवणूक केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com