
Goa Police Arrest Murder Accused On The Run For 35 Years In Salcete
खून प्रकरणात गेल्या 35 वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. सासष्टी येथील राय येथे गोवा पोलिसांनी ही यशस्वीरित्या कारवाई केली.
दरम्यान, गुजरातमधील राजकोट येथील लोधिक पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरिक्षक अरुण गौंस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खूनी आरोपीला बेड्या ठोकल्या. बसप्पा असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा यादगीर, कर्नाटक येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 1990 मध्ये दाखल झालेल्या खून खटल्यासंदर्भात त्याला अटक करण्यात आली.
स्थानिक गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने एएसआय उदय वेळीप यांच्या नेतृत्वाखालील सोमनाथ नाईक, अमरदीप चौधरी आणि धीरज नाईक यांच्या पथकाने सोमवारी (24 फेब्रुवारी) सासष्टी येथील राय येथे आरोपीचा शोध घेऊन अटक केली. मडगावचे एसडीपीओ शिवराम वैंगणकर आणि दक्षिण गोवाचे एसपी टिकम सिंह वर्मा यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
तीन दशकांहून अधिक काळापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला बीएनएसएस 2023 च्या कलम 35 अंतर्गत अटक करण्यात आली. अटकेनंतर, राजकोट पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. तसेच, पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.