Goa Job Scam: मास्टर माईंड 'दीपाश्री'ला अखेर अटक; सरकारी नोकरीचं आमिष दाखवून अनेकांना लावला लाखोंचा चुना

Deepashree Sawant Gavas Arrest: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या पूजा नाईक, प्रिया यादव यांचं प्रकरण गाजत असतानाच आता फोंडा पोलिसांनी दीपाश्री सावंत गावस या महिलेला ताब्यात घेतले.
Goa Job Scam: मास्टर माईंड 'दीपाश्री'ला अखेर अटक; सरकारी नोकरीचं आमिष दाखवून अनेकांना लावला लाखोंचा चुना
Deepashree Sawant Gavas ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

उसगाव येथील एका महिलेला माशेलातील विद्यालयात शिक्षिकेची नोकरी देण्याच्या आमिषाने तब्बल 15 लाख रुपयांना फसवल्या प्रकरणी मास्टर माईंड दीपश्री सावंत गावस ऊर्फ दीपाश्री प्रशांत म्हातो हिला फोंडा पोलिसांनी आज (4 नोव्हेंबर) दुपारी अटक केली.

नोकरी देण्याचे आमिष

दरम्यान, दीपाश्री ही अटक चुकवीत गोव्याबाहेर पळून गेली होती. दुपारी फोंड्यात येताच तिला रीतसर अटक करण्यात आली. गावकरवाडा-उसगावातील एका महिलेला शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने 15 लाखांचा हा व्यवहार झाला होता. त्यात दीपाश्री हीच मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात सुरुवातीला आयआरबी पोलिस असलेल्या कुर्टी-फोंडा येथील सागर सुरेश नाईक याला अटक करण्यात आली होती.

Goa Job Scam: मास्टर माईंड 'दीपाश्री'ला अखेर अटक; सरकारी नोकरीचं आमिष दाखवून अनेकांना लावला लाखोंचा चुना
Goa Job Scam: ‘जॉब माफियां’कडून नियोजनबद्धपणे फसवणूक! कामतांची 'एसआयटी' चौकशीची मागणी

त्यावेळी चौकशी दरम्यान माशेल येथील विद्यालयातील शिक्षिका सुनिता शशिकांत पावसकर हिचे तसेच दीपाश्रीचे नाव संशयित सागर नाईक याने घेतल्याने सुनिता पावसकर हिला 28 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. मात्र 28 रोजीच सागर व सुनिता यांची फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी काही अटींवर जामिनावर मुक्तता केली होती. या दोघांनाही 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजेरी लावण्याची अट घातली होती. सुनिता पावसकर ही सागर नाईक याची नात्याने मामी लागत असल्याचे चौकशीत उघड झाले होते. सुनिता व दीपाश्री या दोघी तिवरे-माशेल येथे कुटुंबासमवेत वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात.

Goa Job Scam: मास्टर माईंड 'दीपाश्री'ला अखेर अटक; सरकारी नोकरीचं आमिष दाखवून अनेकांना लावला लाखोंचा चुना
Goa Job Scam: गोव्यातील खाजगी क्षेत्राची गंभीर अवस्था, सरकारी नोकऱ्यांचा व्यवसाय आणि बेरोजगारीचा विळखा

सुनिता पावसकर हिला अटक झाल्याचे समजताच दीपाश्री फरार झाली होती. त्यामुळे फोंडा पोलिसांनी दीपाश्रीच्या विरोधात लुक आऊट नोटीस बजावली होती. फोंडा पोलिसांनी दीपाश्रीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तिचे मोबाईल लोकेशन बेळगावात सापडले होते. शेवटी आज सोमवारी दीपाश्री फोंड्यात पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत असताना तिला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले. फोंडा पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com