Goa Job Scam: ‘जॉब माफियां’कडून नियोजनबद्धपणे फसवणूक! कामतांची 'एसआयटी' चौकशीची मागणी

Cash For Job: आमदार विजय सरदेसाई सोमवारी नोकरभरती घोटाळाप्रकरण निकाली लागेपर्यंत नोकरभरती स्‍थगित ठेवावी, अशी मागमी अर्जांद्वारे मुख्य सचिवांकडे करणार आहेत.
Cash For Job: आमदार विजय सरदेसाई सोमवारी नोकरभरती घोटाळाप्रकरण निकाली लागेपर्यंत नोकरभरती स्‍थगित ठेवावी, अशी मागमी अर्जांद्वारे मुख्य सचिवांकडे करणार आहेत.
Goa Jobs ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Forward Seeks Special Investigation Team to Probe Job Scam and Suspicious Death

पणजी: ‘नोकर घोटाळा’ प्रकरण सध्‍या चर्चेत आहे आणि याच प्रकरणाशी संबंधित सरकारी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने संबंधितांवर दबाव टाकून ‘चेन ब्रेक’ करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केला असून याप्रकरणी विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली.

गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यात उघडकीस आलेल्या नोकरी घोटाळ्याबाबत सरकारवर गंभीर आरोप केले. कामत यांनी नोकरी घोटाळा पद्धतशीरपणे चालू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेत या मुद्द्यावर आवाज उठविला होता. मात्र, सरकारने त्यावेळी या आरोपांकडे दुर्लक्ष केले होते. हा नोकर घोटाळा नाही, तर संघटितपणे सुरू असलेला नियोजित घोटाळा आहे. याला ‘जॉब माफिया’ म्हणतात. याच ‘जॉब माफियां’च्या साहाय्यानेच नोकऱ्यांची यादी तयार केली जाते आणि बेरोजगार युवकांना फसवले जाते, असा दावाही त्यांनी केला.

कामत यांनी या घोटाळ्यामागे असलेल्यांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सरकारला या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात बेरोजगारी वाढत असताना अशा प्रकारचे घोटाळे बेरोजगार युवकांसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्याची आवश्यकता आहे. जोवर सखोल चौकशी होत नाही, तोवर सरकारने नवीन नोकऱ्या स्थगित ठेवाव्या.

‘घोटाळ्यात अनेकांचा सहभाग शक्य ’

सरकारी नोकर घोटाळा प्रकरणात पोलिस चौकशीला सामोरे गेलेल्‍या एकाने आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिसांनी हे प्रकरण आता संवेदनशीलपणे हाताळण्‍याची गरज आहे, असे मत एल्‍वीस गोम्‍स यांनी व्‍यक्‍त केले.

या घोटाळ्याची व्‍याप्‍ती व्‍यापम घोटाळ्यासारखी असून व्‍यापम घोटाळ्‍याच्‍या चौकशीवेळीही कित्‍येक लोकांनी आत्‍महत्‍या केली होती. आता हीच परिस्‍थिती गोव्‍यातील या सरकारी नोकरी घोटाळ्यात उद्‍भवू शकते, अशी प्रतिक्रिया गोम्‍स यांनी व्‍यक्‍त केली.

दोन दिवसांपूर्वी गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना गोम्‍स यांनी, गोव्‍यातील हा सरकारी नोकरी घोटाळा व्‍यापम घोटाळ्‍यासारखा असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले होते. गोमन्‍तकचे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी त्‍यांची मुलाखत घेतली होती.

Cash For Job: आमदार विजय सरदेसाई सोमवारी नोकरभरती घोटाळाप्रकरण निकाली लागेपर्यंत नोकरभरती स्‍थगित ठेवावी, अशी मागमी अर्जांद्वारे मुख्य सचिवांकडे करणार आहेत.
Goa Job Scam: पूजा नाईकचे 'पॉलिटिकल कनेक्शन' समोर! 'मास्टरमाईंड' महिलेचा शोध सुरु; एका मुख्याध्यापिकेचाही सहभाग

नोकऱ्या स्थगितीचा अर्ज!

आमदार विजय सरदेसाई सोमवारी नोकरभरती घोटाळाप्रकरण निकाली लागेपर्यंत नोकरभरती स्‍थगित ठेवावी, अशी मागमी अर्जांद्वारे मुख्य सचिवांकडे करणार आहेत. आम्ही वारंवार ‘कॅश फॉर जॉब’ सुरू असल्याचे सांगत सरदेसाई सांगत होते, पण त्याकडे सरकारने केवळ दुर्लक्ष केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com