Goa Crime: गोव्यात तीन जुगार अड्ड्यांवर कारवाई; सहा संशयितांना अटक

संशयितांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
gambling zone
gambling zoneDainik Gomantak

Goa Police Raid On Gambling: स्थानिक पोलिसांनी आणि क्राईम ब्रांचच्या शाखेने गोव्यातील 3 ठिकाणी जुगार अड्ड्यांवर कारवाई केली आहे. स्थानिक पोलिसांनी साखळीच्या कारापूर तिस्क येथे आणि कळंगुटच्या मार्केटमधील एका दुकानात व क्राईम ब्रांचच्या शाखेने घोगळ - मडगाव येथे कारवाई केली.

या कारवाईत तिन्ही ठिकांणाहून सहा संशयितांना अटक केली तर त्यांच्याकडून सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांच्या विरोधात गोवा दमण दीव जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

gambling zone
Sports University Goa : गोव्यात क्रीडा विध्यापीठ होणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रांचला मिळालेल्या माहितीच्या आधारे घोगळ - मडगाव येथे ‘रोलेट कॅसिनो’ प्रकारातील जुगारअड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात चार संशयितांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 1 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर दुसरी कारवाई डिचोली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे साखळीच्या कारापूर तिस्क भागात एका खोलीत केली. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्या खोलीवर छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल उल्हास बळवे यांनी रितसर तक्रार दिली होती.

या छाप्यात बुलू ऋषिकेश परिदा या संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 हजार 50 रुपयांच्या रोकडीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. रात्री उशिरा त्याला जामिनावर सोडण्यात आले.

तिसऱ्या कारवाईत कळंगुट मार्केटमध्ये एका दुकानात रोलेट कॅसिनो जुगारअड्ड्यावर बुधवारी सायंकाळी कळंगुट पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात संशयित अजय कुमार (32, रा. पर्वरी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. संशयिताकडून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

gambling zone
राम मनोहर लोहियांचा आदर्श डोळ्‍यांसमोर ठेवून राज्‍याच्‍या उत्‍कर्षासाठी काम करण्‍याची गरज- आमदार कामत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com