Goa Crime: बेकायदेशीररित्या राज्यात राहणाऱ्यांची आता गय नाही; 8 परदेशी नागरिकांवर पोलिसांची कारवाई

Goa Tennent Verification: राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या समस्येचं निराकरण कारण्यासाठी गोवा पोलिसांनीं प्रयत्न
Goa Tennent Verification: राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या समस्येचं निराकरण कारण्यासाठी गोवा पोलिसांनीं प्रयत्न
Goa Tennent VerificationDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या समस्येचं निराकरण कारण्यासाठी गोवा पोलिसांनीं प्रयत्न सुरु केले आहेत. व्हिसा उल्लंघनाच्या अहवालांमुळे अलीकडच्या काही दिवसांत किनारी भागांमधून अनेक एफआयआर(FIR) दाखल करण्यात आल्या.

गोवा पोलीस सध्या राज्यात राहण्याऱ्या बेकायदेशीर लोकांची तपासणी करत आहेत, यासाठीच त्यांनी एक विशेष मोहीम राबवली असून गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दररोज एक एफआयआर (FIR) नोंदवले जात असल्याची माहिती उत्तर गोव्याचे एसपी(SP) अक्षत कौशल यांनी दिली.

Goa Tennent Verification: राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या समस्येचं निराकरण कारण्यासाठी गोवा पोलिसांनीं प्रयत्न
Subhash Velingkar Case: वेलिंगकर पुन्हा पोलीस ठाण्यात, शुक्रवारी तीन तास कसून चौकशी

ज्या घरमालकांनी भाडेकरूंची योग्य तपासणी केलेली नाही त्यांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. ज्या घरमालकांनी भाडेकरूंची माहिती दिलेली नाही त्यांची माहिती उपजिल्हाधीकाऱ्यांकडे पोहचवण्यात आलीये आणि यावर कारवाई देखील होईल. सध्या पोलिसांकडून परदेशी नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस व्हिसाच्या डेटाचा वापर केला जातोय.

ज्या परदेशी व्यक्तींचा व्हिसा कालबाह्य झालाय त्यांच्याविरोधात पोलिसांकडून कायदेशीर पावलं उचलली जात आहेत असेही एसपी(SP) अक्षत कौशल म्हणालेत.आतापर्यंत पोलिसांकडून यासंदर्भात सुमारे 7-8 जणांना अटक करण्यात आली असून, अधिक चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com