Goa Police: शिवोलीत साडेचार लाखाच्या गांजासह आरोपी गजाआड

अमली पदार्थ विकण्याच्या तयारीत असलेल्या मुंबई येथील फिरोज शेख (Firoz Sheikh) याला अमली पदार्थ विरोधी पथकांने सापळा रचून अटक केली.
Arrested
ArrestedDainik Gomantak

पणजी: गोवा पोलिसांच्या (Goa Police) अमली पदार्थ विरोधी पथकांने (एएनसी) काल पहाटे बार्देश तालुक्यातील शिवोली (Shivolim) येथे केलेल्या कारवाईत 4.30 लाख रुपयाचा अमली पदार्थ जप्त केला. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवोली येथे काल पहाटे गांजा हा अमली पदार्थ विकण्याच्या तयारीत असलेल्या मुंबई येथील फिरोज शेख (Firoz Sheikh) याला अमली पदार्थ विरोधी पथकांने सापळा रचून अटक केली.

Arrested
Goa Police: अमलीपदार्थासह नायजेरियन तरुणांना अटक

त्याच्याकडे 4.30 लाख रुपये किमतीचा 4 किलो 300 ग्राम गांजा हा अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी शेख याला अटक करुन न्यायदंडाधिकाऱ्यासमोर उभे केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. गोवा हे जागतीक पर्यटन राज्य आहे. कोरोनासंकटामुळे गेले दिड दोन वर्ष पर्यंटन व्यावसाय ठप्प झाल्यानंतर नुकताच तो खुला होऊन काही प्रमाणात पर्यटक गोव्यात येत आहेत. त्याच पर्यटकांना विकण्यासाठी शेख याने अमली पदार्थ आणण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकणी शेख यांचा अन्य कुणी साथिदार आहे का? याचा तपास पोलिस करत असून पोलिस उपनिरीक्षक अरुण देसाई (Arun Desai) हे या प्रकणाचा तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com