'प्रेमसंबंध असले, तरी लैंगिक संबंधांसाठी कायदेशीर संमती नाही', लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला 20 वर्षांची शिक्षा, कोर्टाचा कठोर निर्णय

Goa POCSO Case: लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी पणजी येथील जलदगती विशेष पॉक्सो न्यायालयाने २८ वर्षीय आरोपी मोहम्मद शाहनशाह याला दोषी ठरवत २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
Sexual Assault Case
Sexual Assault CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : म्हापसा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याप्रकरणी पणजी येथील जलदगती विशेष पॉक्सो न्यायालयाने २८ वर्षीय आरोपी मोहम्मद शाहनशाह याला दोषी ठरवत २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला १ लाख ९० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, ही रक्कम वसूल झाल्यानंतर पीडितेला भरपाई म्हणून देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांच्या पीठाने शुक्रवारी हा निकाल दिला. आरोपी मोहम्मद शाहनशाह (वय २८, रा. म्हापसा; मूळ रा. बिहार) याला पॉक्सो कायद्यातील कलम ४, ६, ८ आणि १२ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ६४ अंतर्गत दोषी ठरविण्यात आले. मात्र, अपहरण आणि बेकायदेशीर डांबून ठेवल्याच्या आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Sexual Assault Case
Goa Crime: 'रोड रेज'च्या वादातून सुरीने वार; तरुण गंभीर, नास्नोळा येथील घटना; संशयिताला अटक

सप्टेंबर २०२४ मधील घटना

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये आरोपीने म्हापसा येथील पेट्रोल पंपाजवळील आपल्या खोलीत अल्पवयीन मुलीला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत ती सहा आठवड्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर म्हापसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेमसंबंध म्हणजे संमती नव्हे

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने पीडित मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध असले, तरी त्यातून लैंगिक संबंधांसाठी कायदेशीर संमती गृहित धरता येत नाही. पॉक्सो कायद्यानुसार अल्पवयीन व्यक्तीची संमती कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरली जाऊ शकत नाही.

Sexual Assault Case
36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

आरोपीचा युक्तिवाद फेटाळला

आरोपीने आपण विवाहित असून दोन मुलांचा पिता असल्याचे तसेच कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असल्याचे सांगत शिक्षेत सवलत देण्याची मागणी केली होती. कठोर शिक्षेमुळे कुटुंबावर विपरीत परिणाम होईल, त्यामुळे शक्य तितकी किमान शिक्षा द्यावी, असा बचाव पक्षाचा युक्तिवाद होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत कठोर शिक्षा सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tarun Tejpal Sexual Assault Case
Tarun Tejpal Sexual Assault Case
Mapusa Child Assault Attempt
Sexual Assault Case Khorlim Mapusa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com