POCSO Accused Death: मेरशी न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारलेल्या पॉक्सो आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa POCSO Accused Death: मेरशी येथील न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पॉक्सो प्रकरणातील आरोपीचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी), बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Goa POCSO Accused Death
POCSO Accused DeathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मेरशी येथील न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पॉक्सो प्रकरणातील आरोपीचा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी), बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. न्यायालयीन कोठडीत रवानगीची प्रक्रिया सुरू असताना त्याने उडी मारली होती.

म्हापसा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या पॉक्सो प्रकरणात आरोपीला शुक्रवारी निकालासाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावून कोलवाळ कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले होते.

Goa POCSO Accused Death
Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

तसेच १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते. शनिवारी न्यायालयीन कोठडीत घेण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपीने अचानक पाचव्या मजल्यावरून उडी मारली. तो दुसऱ्या मजल्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com