Pernem Crime Case: पेडणे पोलिसांची बूमरँग रिसॉर्टवर धाड; वेश्याव्यवसाय प्रकरणी मालकासह दोघांना अटक

Pernem Crime Case: पोलिसांनी या रिसॉर्टमधील सीसीटीव्ही, कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत
Prostitution
ProstitutionDainik Gomantak

Pernem Crime Case: पेडणे पोलिसांनी आश्वे येथील बूमरॅंग रिसॉर्टमध्ये छापा टाकला असून या भागात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यावेळी उत्तर भारतातील 23 ते 24 वयोगटातील दोन पीडितांची पोलिसांनी यशस्वीरित्या सुटका केलीय.

या गैरव्यवहाप्रकाराणी पोलिसांनी रिसॉर्टचा मालक विजय कुमार सरकार, (वय 44 वर्ष रा. झारखंड) आणि त्यांचा सहाय्यक अजित कुमार झा (मूळ बिहार) यांना अटक केल्याची माहिती पेडणे उपविभागीय पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांनी दिलीय.

Prostitution
Arvind Kejriwal Goa Visit: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भगवंत मान यांच्यासह गोव्यात दाखल

जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली पेडणे पोलीस स्टेशनचे सचिन लोकरे आणि पीआय नारायण चिमुलकर आणि एनजीओच्या सदस्यांसह कर्मचारी, जुलियाना लोहार आणि शायोरी बॅनर्जी यांनी रिसॉर्टवर छापा टाकला.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार रिसॉर्टमध्ये आलेल्या ग्राहकांना डान्सच्या नावाखाली तरुणी पुरवण्याचे काम सुरू असल्याचा प्राथमिक दृष्टया पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी या रिसॉर्टमधील सीसीटीव्ही, कागदपत्रे ताब्यात घेतले असून ग्राहकांनी रिसॉर्टकडे केलेले ऑनलाईन- डिजिटल पेमेंट रेकॉर्ड आणि पीडितांची घेण्यात आलेली छायाचित्रे जप्त करण्यात आलीय.

Prostitution
पणजीतील MG रोड बंद होणार, वाहतूक '18 जून'ने वळवणार; MD नी सांगितली Smart City च्या कामांची स्थिती

वेश्यालय म्हणून वापरण्यात आलेले सदर बूमरँग हे रिसॉर्ट सील करण्यासाठी दंडाधिकार्‍यांकडे पत्र पाठवण्यात आले आहे.

तसेच त्या रिसॉर्टमध्ये उपस्थित असलेल्या पर्यटकांनाही चौकशीसाठी बोलावले जाणार असून चौकशी अंती याप्रकरणी आणखी काही जणांनाही अटक होणार असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पेडणे न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यांनी आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

छापा टाकण्याच्या महत्वाच्या कामगिरीसाठी पोलीस पथकातील पीआय सचिन लोकरे, पीआय नारायण चिमुलकर, पीएसआय योगेश मांद्रेकर यांच्यासह तीर्थराज म्हामल,सुदेश पाटील, स्मितल बांदेकर, वासू सावंत, प्रेमनाथ सावलदेसाई, प्रज्योत मयेकर, सचिन हाळर्णकर, कृष्णा वेळीप, शशांक साखळकर, विनिता हुमरसकर, पलक तिळवे, स्वाती हाळर्णकर यांनी समावेश घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com