MLA Jit Arolkar: ''...अन्यथा सरकारच्या विरोधात जनता मतदान करेल; 'जमीन आराखड्यासाठी मी लोकांसोबत''- आरोलकरांचा इशारा

पेडणे तालुक्यातील जमीन आराखडा अर्थात झोन बदल प्रकरण चांगलेच तापले आहे.
MLA Jit Arolkar
MLA Jit ArolkarDainik Gomantak
Published on
Updated on

MLA Jit Arolkar पंचायती, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता जो जमीन आराखडा तयार केला गेलाय तो लवकरात लवकर रद्द करावा, अन्यथा मी स्वतः जनतेसोबत राहून रस्त्यावर उतरून आंदोलन करीन असा इशारा मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी दिलाय.

पेडणे तालुक्यातील जमीन आराखडा अर्थात झोन बदल प्रकरण चांगलेच तापले असून स्थानिकांनी आमदार जीत आरोलकर यांची भेट घेऊन आपण यात लक्ष घालावे अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर रविवारी पेडणे भगवती सभागृहामध्ये तालुक्यातील नागरिकांची बैठक पार पडली.

वेळप्रसंगी माझ्यावर सरकारने कारवाई केली तरी चालेल किंवा सरकारमधून काढून टाकले तरी चालेल मला त्याची पर्वा नाही. सरकारने जर प्लॅनिंग झोन रद्द केला नाही तर, येणाऱ्या लोकसभेच्या विरोधात सरकारच्या विरोधात जनतेने मतदान करावे असे बेधडक आवाहन मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी जमीन आराखडा विरोधी सभा बैठकीदरम्यान दिले.

हा आराखडा लोकांना विश्वासात न घेता शिवाय स्थानिक, सरपंच, पंचायत मंडळ, सामाजिक संघटना यांना विश्वासात न घेता तयार केलेला आहे. या आराखड्यात स्थानिकांना ज्या पद्धतीने बदल हवा असेल त्याप्रमाणे तो बदल सरकारतर्फे होणं आवश्यक आहे.

तसे न झाल्यास तो आराखडा रद्द करावा. या मागणीसाठी रविवारी श्री भगवती हायस्कूल सभागृहामध्ये पेडणे तालुक्यातील नागरिकांची सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

MLA Jit Arolkar
Indian Super League मध्ये आज एफसी गोवा-पंजाब लढत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com