Panjim Smart City: 'स्मार्ट बस शेड्स' हा घोटाळा, स्थानिक आमदार मोन्सेरातांचा सरकारवर घणाघात

Panjim Smart City: या बस शेड्सचे डिझाइन एवढ्या खालच्या दर्जाचे आहे की याला स्मार्ट सिटीचे हे बस शेड्स म्हणावं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Panjim Smart City
Panjim Smart CityDainik Gomantak

Panjim Smart City: स्मार्ट सिटी कामांवरून काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीच्या आणखी एका कामावरून सरकारवर घणाघात केलाय.

पणजी स्मार्ट बस शेड्स हा मोठा घोटाळा असून जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप खुद्द स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे.

या बस शेड्सचे डिझाइन तसेच तिथे जाहिराती करण्यासंबंधी दिलेले हक्क या सर्व बाबतीत चौकशीची गरज असून त्यासाठी त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी बाबूश मोन्सेरात यांनी या पत्रातून केली आहे.

बाबूश यांनी या पत्रात असे म्हटले आहे की, या बस शेड्सचे डिझाइन एवढ्या खालच्या दर्जाचे आहे की याला स्मार्ट सिटीचे हे बस शेड्स म्हणावं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महसूल बुडणार..

पणजी शहरात अशा 36 बस शेड्स उभारण्यात येत असून 7 वेगवेगळ्या मार्गावर 48 बस धावणार आहेत. या ठिकाणी जाहिरातींचे हक्क कदंब महामंडळ व प्राइमस्लॉट इव्हेंटस कंपनीकडे करार करून दिलेले आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडणार असल्याचे बाबूश यांचे म्हणणे आहे.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित नाही-

कला अकादमीसमोर असलेला रॅम्प सुरक्षित नाही. दिव्यांग व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक तो वापरू शकत नाहीत, असे इंटेलिजन्ट ट्रान्स्पोर्टेशन मॅनजेमेंट सिस्टमने अहवालात म्हटले आहे, याकडेही बाबूश यांनी लक्ष वेधले आहे.

सुरक्षा धोक्यात-

एवढेच नव्हे तर या बसशेडची रचनाच अशी अवघड आहे की त्यामुळे बसचालक आणि प्रवासी यांना एकमेकांना पाहणे अवघड बनवते, त्यांतून प्रत्येकाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

Panjim Smart City
Goa River: ‘रगाडा’ नदी सापडलीय प्रदूषणाच्या विळख्यात!

उन्हा-पावसात छत साजेसं नाही-

बस शेड्सचे डिझाइन पाहता अत्यंत कमी लोक या शेडमध्ये मावतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे, तसेच शहरातील हवामानालाही या शेड्स साजेशा नाहीत. या ठिकाणी केलेली आसन व्यवस्था अपुरी व अडचणीची आहे, तसेच छतही मान्सूनमध्ये पावसापासून किंवा उन्हाळ्यात संरक्षण देऊ शकणार नाही, असे त्यांनी पत्रातून निदर्शनास आणले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com