Goa Monsoon: राज्यातील पावसाचा जोर गेल्या 24 तासांत कमी झाला आहे, मात्र काही 21 पर्यंत राज्यात पावसाची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे. तापमानात वाढ झाली असून पणजी येथे कमाल 32.4 अंश सेल्सिअस तर किमान 24.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मंगळवारपासून उत्तर अंदमान समुद्र आणि शेजारच्या परिसरात चक्रीवादळाचे परिवहन आहे. सरासरी समुद्रसपाटीपासून 3.1किमी पर्यंत पसरले आहे, त्याच्या प्रभावाखाली, पुढील 24 तासांत दक्षिणपूर्व आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
मध्य बंगालच्या उपसागरावर 22 ऑक्टोबर रोजी सकाळी पश्चिमेकडे सरकण्याची आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत पश्चिममध्य बंगालच्या उपसागरात ते आणखी तीव्र होऊन चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे. मात्र याचा गोव्यावर सद्यःस्थितीत कोणताही प्रभाव नाही, असे वेध शाळेतर्फे स्पष्टकरण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.