Kala Academy: वास्तुकलेचा एक आदर्श नमुना ठरलेल्या कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा स्लॅब जुलै 2023 मध्ये कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले होते.
त्यानंतर या भागाची डागडुजी करत 10 नोव्हेंबर 2023 ला राज्याच्या संस्कृतीची ओळख असलेल्या कला अकादमीचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन केले. मात्र त्यानंतर सातत्याने अकादमीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा घटना घडत आहेत.
27 जानेवारीला संध्याकाळी दीनानाथ मंगेशकर सभागृहातील पाणी पाईप लाईनला गळती लागल्याची घटना घडली.
गळती लागल्याने अकादमीच्या प्रेक्षकगृहातील सीटवर पाणी आले. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पुन्हा कला अकादमीच्या कामाबद्दल आणि एकूणच या सर्व प्रकाराबद्दल तीव्र नाराजी गोमंतकीयांनी व्यक्त केली.
आत्ता त्या पुढची पायरी म्हणजे याच सभागृहात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर दिसून आलाय. या घटनेचेही व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झालेय.
गोवा फॉर्वर्डचे दुर्गादास कामत यांनी या प्रकाराबद्दल प्रशासनावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत.
आधी छत कोसळण्याचा प्रकार आणि आता पाइपलाइनमधील गळती प्रकरण या गोष्टी गंभीर असून चार्ल्स कोरिया फाउंडेशनने नूतनीकरण केलेल्या कला अकादमीचे ऑडिट करणं आवश्यक आहे.
अन्यथा एक दिवस असा येईल संपूर्ण 'ताजमहाल' कोसळेल आणि सरकार मात्र त्याचे खापर इथल्या हवामानावर फोडेल असा उपरोधिक टोला कामत यांनी हाणला आहे.
कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा स्लॅब कोसळण्याच्या प्रकरणी कला अकादमीचे अध्यक्ष आणि कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांची त्वरित मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही गोवा फॉरवर्डने याआधी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.