Panjim Crime Case: 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यावर देशात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
मात्र 22 तारीख पासून आज म्हणजेच 24 तारखेपर्यंत गोव्यात मात्र सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवणाऱ्या घटना घडल्या आहेत.
आज घडलेली घटना ही महाविद्यालयाशी संबंधित असून या प्रकारानंतर समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
अल्तिन्हो येथील गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने श्रीरामांवरच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपाहार्य पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकारानंतर घटनास्थळी पणजी पोलिसांना पाचारण करण्यात आले असून फोटो शेअर करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. हिंदू धर्माीयांच्या भावना दुखावणाचा हा प्रकार मागील तीन दिवस सुरु असून तीन दिवसातील ही तिसरी घटना आहे.
या आधी 22 तारिखला अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी आक्षेपार्ह संदेशासह बाबरी मशिदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने म्हापशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
काल म्हणजेच 23 तारिखला सोशलमिडीयावर एका पोस्टवर प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या व्यक्ती विरोधात गोमंतक स्वराज्य संस्था आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर आज ही गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घटना घडली असून घटनास्थळी पोलीस पथक रावण झाले असल्याची माहिती मिळली आहे.
गोव्यानजीकच्या सिंधुदुर्गातही असे काही प्रकार घडले असून सावंतवाडी, वेंगुर्ला या ठिकाणी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यासाठी भाजप कार्यकर्यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी पोलीस स्टेशनला घेराव घातला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.