Panjim Ashtami Ferry: अष्टमीच्या फेरीतून दमदार कमाई

गतवर्षीपेक्षा यंदा अष्टमी फेरीतून 60 लाखांचा अधिक महसूल : महानगरपालिका आयुक्तांची माहिती
Panjim Ashtami Ferry
Panjim Ashtami FerryDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Ashtami Ferry पणजी महानगरपालिकेला यंदाच्या अष्टमीच्या फेरीतून गतवर्षीपेक्षा 60 लाखांचा अधिक महसूल मिळाला आहे. गतवर्षी महानगरपालिकेला 30 लाखांचा महसूल मिळाला होता, यावर्षी 90 लाखांपर्यंत महसुलाने टप्पा गाठल्याची माहिती आयुक्त क्लेन मेदेरा यांनी ‘गोमन्तक'ला दिली.

गतवर्षी अष्टमीच्या फेरीच्या अर्जांचा काळाबाजार झाला होता. यंदा अर्जासाठी आलेल्या विक्रेत्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात गर्दी केली होती, त्यामुळे गोंधळ उडाला आणि झालेली गर्दी पांगवण्यासाठी महानगरपालिकेला पोलिस बंदोबस्त मागवावा लागला होता.

त्यावेळी सुरवातीला घेतलेले अर्ज बाद ठरवून नव्याने अर्ज विक्री करण्यात आली होती. त्यातून महानगरपालिकेला 30 हजारांचा महसूल मिळाला होता. यंदा महानगरपालिकेने दुकानभाडे वाढविल्याने महसूल वाढणार हे निश्‍चित होते. परंतु अर्ज विक्रीच्यावेळी बारा दिवसांच्या फेरीचे एकरकमी भाडे भरणे आवश्‍यक होते.

एवढी मोठी रक्कम ज्यांना भरणे शक्य आहे, त्यांनी ते भरले. परंतु ज्यांना ते शक्य नव्हते ते अर्ज भरण्यास फिरकलेच नाहीत. यावर्षी महानगरपालिकेने वाढविलेल्या भाड्यामुळे 90 लाखांचा महसूल मिळाला आहे.

गतवर्षीपेक्षा 60 लाख रुपये अधिक महसूल मिळाला आहे. परंतु अशा कामासाठी पणजी महानगरपालिकेची बरीच यंत्रणा व्यक्त होत असते. या प्रक्रियेत आणखी काही सुविधा आणण्याच्या सूचना आता नगरसेवकांकडून आल्या आहेत.

Panjim Ashtami Ferry
Goa Accident: नियंत्रण सुटल्‍याने कारचा अपघात, चालक जखमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Casino Director Shooting Case
Why 1980s Are Trending in India
Mahikavati Bakhar History
Goa Ashtami Fair 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com