Goa Panchayat Election : यंत्रणा सज्ज! 45 मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर

पंचायत निवडणुकीचा प्रचार संपला; घरोघरी गाठीभेटी सुरूच
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Panchayat Election : राज्यातील पंचायत निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार सोमवारी सायंकाळी 5 वाजता संपला असून घरोघरी गाठीभेटी घेण्याबरोबर सोशल मीडियावरील प्रचार सुरूच राहणार आहे. बुधवारी 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून आज मंगळवारी मतदानासाठीचे सर्व साहित्य संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचवण्यात येईल. आतापर्यंतचा निवडणूक प्रचार शांततेत झाल्‍याची माहिती आयोगाने दिली. विविध पंचायती मधील 64 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. मतमोजणी 12 ऑगस्‍ट रोजी होणार आहे.

ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी विशेष सोय

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता आणि दिव्यांग मतदारांसाठी बॅलेट पेपरची सोय करण्यात आली होती. मात्र, पंचायत राज्य कायद्यामध्ये याबाबतची तरतूद नसल्याने सर्व मतदारांना यावेळी मतदान केंद्रावरच मतदान करावे लागेल. पण त्यांच्यासाठी प्राधान्याने विशेष सवलत मिळेल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.

186 पंचायतींसाठी उद्या मतदान

पंचायत निवडणुकीसाठी यंदा प्रथमच 45 इतक्या मोठ्या प्रमाणात संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून निवडणूक आयोगाने जाहीर केली आहेत. यातील उत्तर गोव्यात 27 तर दक्षिण गोव्यातील 18 मतदार केंद्रांचा समावेश आहे. यात उत्तर गोव्यात सर्वाधिक बार्देश येथे 15 तर दक्षिण गोव्यात मुरगाव येथे सर्वाधिक 12 मतदान केंद्रांचा समावेश आहे. तर तिसवाडी मध्ये 12, सासष्टीमध्ये 4 केपेमध्ये 2 संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे.

Goa Panchayat Election
Digambar Kamat : दिगंबर कामतांनी आमदारकी सोडावी, मगच भाजपमध्ये यावे

5038 उमेदवार रिंगणात

राज्यातील 186 पंचायतींच्या 1464 प्रभागांसाठी 5 हजार 38 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी 7 लाख 97 हजार 20 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये महिलांची संख्या जास्त असून 4 लाख 10 हजार 18 महिला मतदार आहेत. तर 4 लाख 87 हजार 1 पुरुष मतदार आहेत.

सकाळपासूनच साहित्याचे वाटप

निवडणूक आयोगाने 1517 मतदान केंद्रांची उभारणी केली असून यासाठी सुमारे 10 हजार 700 कर्मचारी तैनात केले आहेत. यात बंदोबस्तासाठीच्या पोलिसांचाही समावेश आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. यासाठी सकाळपासूनच मतदानासाठी लागणारे मतपत्रिका, मतदान पेट्या आणि इतर साहित्यांचे वाटप संबंधित मामलेदार कार्यालयावरून करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com