Goa Panchayat Election : सरपंच-उपसरपंच निवडीसाठी आजी-माजी आमदारांचे प्रयत्न

ज्योशुआ, बाबूश, जेनिफर, कामत मात्र अलिप्त
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

Goa Panchayat Election : राज्यातील 186 पंचायतीच्या सरपंच व उपसरपंच सोमवारी सकाळी ठरविण्यात आले. त्यामुळे पंचायतीवर विविध पक्षाचे आमदार दावा सांगत असले तरी पंचायतीत प्रत्यक्षात आपली सत्ता यावी, यासाठी आजी-माजी आमदारांना दिवसभर मतदारसंघात थांबावे लागल्याचे चित्र दिसून आले.

अनेक आजी-माजी आमदारांनी सकाळी सरपंच-उपसरपंच निवडी झाल्यानंतर तत्काळ त्या नवनियुक्त सदस्यांबरोबर आजी-माजी आमदारांनी छायाचित्रे काढीत आपले प्राबल्य संबंधित पंचायतीवर असल्याचे दाखवून दिले. भाजपने अधिकृतपणे 142 पंचायतीवर आपली सत्ता आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इतर काही पंचायतींवर खरोखरच भाजपला पाठिंबा देणारे मगो किंवा अपक्ष आमदारांचे वर्चस्व असणार हे निश्‍चित आहे.

(Goa Panchayat Election)

Goa Panchayat Election
Home Loan : गृहकर्ज योजनेपासून शिक्षक वंचित; शिक्षण संचालकांना नोटीस

त्याशिवाय बार्देशमध्ये कळंगुट मायकल लोबो, आमदार कार्लुस फरैरा, आमदार केदार नाईक, केपे आमदार एल्टन डिकॉस्ता, सांतआंद्रेत आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघातील काही पंचायतींवर आपल्या पंचायतीचे सरपंच-उपसरपंच निवडून आणले आहेत.

त्याशिवाय पंचायतीच्या निवडणुकीपासून मात्र म्हापसा आमदार ज्योशुआ डिसोझा, पणजीचे बाबूश मोन्सेरात, ताळगावच्या जेनिफर मोन्सेरात, मडगावचे दिगंबर कामत हे मात्र अलिप्त राहावे लागले. ताळगाव मतदारसंघात ताळगाव पंचायत सोडली, तर इतर चार मतदारसंघात पालिका आहेत.

आपापल्या मतदारसंघातील पंचायती आपल्या ताब्यात रहाव्यात यासाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु निकालानंतर कोणती पंचायत कोणाकडे जाणार हे स्पष्ट झाले होते. कळंगुट मदतदारसंघ काँग्रेसकडे आहे. त्याठिकाणी आमदार माकयल लोबो यांचे वर्चस्व पणाला लागले होते, पण कळंगुट पंचायतीवर जोसेफ सिक्वेरा यांनी आपला दबदबा कायम असल्याचे दाखवून दिले होते.

त्याशिवाय तिसवाडीत सांत आंद्रे मतदारसंघात रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर हे पंचायतीत आपली सत्ता आणणार याकडे लक्ष होते. परंतु आगोशी-मंडूर ही पंचायतीवर त्यांनी हक्क सांगितला, त्याशिवाय माजी आमदार टोनी फर्नांडिस यांना सांताक्रूझमधील सांताक्रूझ पंचायतीवर आपलाच झेंडा राहणार हे दाखवून दिले.

सत्तरी, डिचोलीत भाजपसमर्थक

डिचोलीत डॉ. चंद्रकांत शेट्ये व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपापल्या मतदारसंघातील पंचायतींत आपल्या मर्जीचे सरपंच-उपसरपंच निवडून आणले आहेत. सत्तरीत मात्र आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या विचारांचेच सरपंच-उपसरपंच ठरणार हे निश्‍चित होते. सत्तरी, डिचोली भाजप समर्थकांची वर्णी लागलेली आहे.दक्षिण गोव्यात माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या विचाराचे खोला पंचायतीत सरपंच-उपसरपंच ठरले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com