Panaji Vegetable Price: भाजीपाल्याच्या दरात किंचित झाली घट

Panaji Vegetable Price: बाजारात हिरव्या मिरचीने गाठली शंभरी
Vegetables Panaji| Goa News
Vegetables Panaji| Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Vegetable: राज्यात कांदे, बटाटे तसेच इतर भाजीपाला देखील अजून महागच आहेत. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून टॉमेटोच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. टॉमेटो 50 रूपये प्रति किलो दराने विकले जात होते. मिरची अजूनही तिखटच आहे कारण गेल्या वर्षी 40 ते 50 रूपये प्रती किलो दराने मिळणाऱ्या हिरव्या मिरचीने शंभरी गाठली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात भाजीपुरवठा करणाऱ्या कर्नाटक व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने अनेक पिकांची नासाडी झाली. परिणामी उत्पादनात घट झाली आहे. त्यासोबच यंदा शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक कमी प्रमाणात घेतले, कारण शेतकऱ्यांना गतवर्षी मिरची उत्पादनात अपेक्षित भाव मिळाला नाही.

यंदा शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात उत्पादन घेतले. त्यामुळे यंदा बाजारात मिरचीचा तुटवडा जाणवत असल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 40 रुपये जुडी मिळणाऱ्या कोथिंबिरीचे भाव देखील 10 रुपयांनी उतरले आहेत.

दर प्रतिकिलो (रुपयांत)

कांदा - 40

बटाटा - 40

टोमॅटो - 30

गवार - 60

कोबी - 40

फ्लॉवर - 40

गाजर - 60-80

भेंडी - 70-80

शिमला मिरची - 80

हिरवी मिरची- 100

Vegetables Panaji| Goa News
Road Issue in Goa : अर्धफोंड पुलावर वाहतुकीला अडथळा; विस्तारीत जोडणीमुळे प्रवाशांची गैरसोय

पाले भाजी प्रती जुडी

मेथी - 20

लालभाजी - 20

कांदापात - 20

मुळा - 20

पालक - 20

शेपू - 10

पुदिना - 10

कोथिंबीर - 30

लिंबू - 5 रूपयांना 1

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com