
पणजी: पणजीत कधी नव्हे ती मागील दोन वर्षांत मसाज पार्लरची संख्या वाढली आहे. मध्य पणजीत ५० मीटरच्या आत सुमारे ८ मसाज पार्लर आहेत. त्याशिवाय अगदी मिरामार, सांतिनेज परिसरही आता मसाज पार्लरपासून सुटलेला नाही. यातील काही पार्लरमध्ये चालणाऱ्या अनैतिक बाबीच एका टॅक्सीचालकाने समोर आणल्या आहेत.
एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत तो म्हणतो, की मसाज पार्लरलमध्ये गेल्यावर ग्राहकाला दोन हजार रुपये द्यावे लागतात, त्यानंतर अधिक पैसे दिल्यास इतर अनैतिक गोष्टीही करता येतात. चालकाने सांगितलेली ही बाब पणजीतील मसाज पार्लरबाबत आता संशय निर्माण करणारी आहे.
किनारी भागात मसाज पार्लरची संख्या वाढली असल्याने आणि नव्या परवान्यांना किंवा पार्लरसाठी जागा मिळत नसल्याने कदाचित पार्लरचा व्यवसाय करणाऱ्यांनी आपला मोर्चा राजधानी पणजीकडे वळविला असावा.
एकाच परिसरात सर्वात जास्त मसाज पार्लर आहेत, त्या नगरसेवकावर सत्ताधारी गटाची बरीच मर्जी असल्याची चर्चा महापालिकेत सतत दबक्या आवाजात सुरू असते. टॅक्सी चालकाने केलेले वक्तव्य हे काही मसाज पार्लरमधील घडत असलेले वास्तव सांगणारे आहे, त्यामुळे आता पोलिस याविषयी काय पावले उचलणार हे पाहावे लागणार आहे.
उत्पल पर्रीकर यांनी काही आठवड्यांपूर्वी पणजीत वाढलेल्या मसाज पार्लरविषयी चिंता व्यक्त केली होती. त्याशिवाय या पार्लरमध्ये मध्यरात्री होत असलेल्या हप्ता वसुलीवरही भाष्य केले होते. याशिवाय पणजीला स्पा सिटी करण्याचाच हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मसाज पार्लर किंवा स्पांना दिल्या गेलेल्या परवान्यांविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.