Goa Crime News: जमीन महाघोटाळ्याचा सूत्रधार विक्रांत शेट्टी याला पुन्हा अटक

Goa Crime News: बनावट कागदपत्रे : एसआयटीच्या तपासाची चक्रे गतिमान
Goa Crime News | Goa News
Goa Crime News | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने जमीन हडप करून इतरांना विकल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अनेक प्रकारच्या षडयंत्रांचा सूत्रधार असलेल्या विक्रांत शेट्टी याच्या विरोधात पुन्हा गुन्हा नोंदवत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये शेट्टी हा अनेक जमीन हडप प्रकरणांमध्ये सहभागी असून पोलिसांनी त्याला लक्ष्य करत चारी बाजूंनी फास घट्ट केला आहे.

खोट्या कागदपत्रांच्या साहाय्याने रिकाम्या जागा हडप करून दुसऱ्यांना विकल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने गुन्हा अन्वेेषण विभागाच्या मदतीने विशेष तपास पथक स्थापन करून तपास सुरू केला आहे.

विविध पोलिस स्थानकांमध्ये अशा प्रकारच्या नोेंद असलेल्या तक्रारी या एसआयटीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 102 तक्रारी नोंद झाल्या असून यात अनेक गुन्हेगार विविध ठिकाणच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे सबळ पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.

पोलिसांनी प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून संबंधित गुन्हेगारांचे अटक सत्र सुरू केले आहे. यापूर्वी 18 जून 2022 रोजी एसआयटीने शेट्टीला अटक केली होती. याच प्रकरणात अभिलेखागार विभागातील दोन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती.

बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने हणजुणेतही बळकावली जमीन

हणजुणेतील जमीन हडप प्रकरणात आठ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जमिनीचा समावेश आहे. शेट्टी याच्याबरोबर लुईसा मारिया डेस ऊर्फ लिसा फर्नांडिस आणि इतर सहकाऱ्यांनी हे प्रकरण घडवून आणल्याची तक्रार जस्टिन राफेल डिसोझा यांनी दिली आहे. या जमिनीची जस्टिन या कायदेशीर मालक असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन संशयितांनी इतरांना विकली आहे.

अटक-जामिनाचे सत्र :

बनावट दस्तऐवज तयार करून जमीन हडप केल्याप्रकरणी यापूर्वी विक्रांत शेट्टी याला दोनदा अटक झाली आणि दोनदा त्याची जामिनावर सुटका झाली आहे. त्याच्यावर फसवणूक, कागदपत्रांत फेरफार करणे, कट-कारस्थान रचण्याचा गुन्हा नोंद केला आहे. भारतीय दंड संहिता कलम 465, 466, 467, 468, 471 आणि 420 (ब) अंतर्गत विक्रांत शेट्टी याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

आतापर्यंत चार गुन्हे नोेंद

संशयित विक्रांत शेट्टी हा अनेक वर्षांपासून जमीन विक्री प्रकरणांत सक्रिय आहे. अनेक प्रकारच्या बनावट दस्तऐवजांच्या आधारे अनेक ठिकाणच्या जमिनी शेट्टी याने इतरांना विकल्या आहेत.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पहिल्यांदा याच शेट्टीला अटक करत तपास सुरू केला होता. प्रामुख्याने उत्तर गोव्यातील जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरित केल्या आहेत. त्याच्या विरोधात आतापर्यंत चार गुन्हे नोंद झाले असून पोलिस त्याच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी कसून तपास करत आहेत.

Goa Crime News | Goa News
Cortalim Traffic: कुठ्ठाळी-आगशी वाहतुक कोंडी सुटेना; प्रशासन सहनशक्तीचा अंत पाहतेय का?

मोडस ऑपरेन्डीवरून सूत्रधार जाळ्यात

बनावट दस्तऐवज आणि फेरफार केलेल्या कागदपत्रांचा वापर करून विक्रांत शेट्टी याने अनेक जमीन घोटाळे केल्याचे उघड झाले आहे. जमीन विक्री प्रकरणातील या त्याच्या मोडस ऑपरेन्डीवरूनच पोलिसांचा विक्रांत शेट्टीवरील संशय बळावला आणि त्या दिशेने तपास सुरू केला असता, एकाहून अनेक जमीन हडप प्रकरणात विक्रांतचाच हात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत अलगद पोहोचले. या प्रकरणात आणखी काहीजणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

सरकारी कर्मचारी रडारवर :

हणजुणे येथील सर्व्हेक्षण क्रमांक 426/1 एस अंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हडप करण्याचा आरोप शेट्टीवर ठेवला आहे. सबरजिस्ट्रार म्हापसा यांच्याकडे या प्रकरणाची नोंदणी केली होती. त्यामुळे काही सरकारी कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com