Goa News: ‘कदंब’ची म्हापसा-कामुर्ली बससेवा अनियमित

Goa News: चालक, वाहकांची वानवा : ग्रामस्थांना मोटारसायकल, रिक्षा भाडे परवडेना
Mapusa-Camurlim Bus Service | Goa News
Mapusa-Camurlim Bus Service | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: ग्रामीण भागात लोकांच्या प्रवासासाठी कदंबच्या बसगाड्या असल्या तरी कामुर्ली गावात संध्याकाळी 7.15 वाजता शेवटची कदंब बस आहे. मात्र ती अनियमित आहे. त्यामुळे कामुर्लीतून म्हापसा बाजारपेठेत लहान-सहान व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची, तसेच नोकरदारांची घरी जाताना मोठी गैरसोय होते.

अचानक बस रद्द केल्याने लोकांना भरमसाट भाडे देऊन रिक्षा किंवा मोटारसायकल पायलट घेऊन घर गाठावे लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

म्हापसा-कामुर्ली या मार्गावर शेवटची कदंब बस संध्याकाळी 7.15 वा. म्हापसा येथून सुटते. कामुर्ली या गावातील ती शेवटची बस असल्याने म्हापसा बाजारपेठेतील भाजी तसेच इतर व्यापाऱ्यांची गर्दी असते.

पण या बसचा काहीच नेम नसतो. अनेकदा ही बस चालक वा वाहक नसल्याचे कारण देऊन पाठवली जात नाही. कामुर्लीतील व्यापारी या बसने सायंकाळी घरी परततात. ही बस रात्री कामुर्ली येथे मुक्कामाला थांबते आणि सकाळी 7.15 वा. म्हापशाकडे येते. त्यामुळे सकाळीही येथील महिला विक्रेत्यांची सोय होते.

मात्र, बसच्या अनियमितपणामुळे भरमसाट भाडे देऊन त्यांना रिक्षा किंवा मोटारसायकल पायलट घेऊन घरी गाठावे लागते.

कदंब अधिकाऱ्यांकडून दुरुत्तरे

म्हापसा कदंब डेपोच्या काऊंटरवर विचारणा केल्यास त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वयस्क महिला विक्रेत्यांचीही दुरुत्तरे देऊन मानहानी केली जाते. म्हापसा स्थानकावर बस रिकामी उभी असते. मात्र चालक व वाहक नसल्याची कारणे दिली जातात.

या बसस्थानक प्रमुखांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने ते स्वतःच्या मर्जीनुसार वागतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी काही विक्रेत्यांनी केली आहे.

Mapusa-Camurlim Bus Service | Goa News
Iffi Goa : गेल्या 18 वर्षात गोव्यातला इफ्फी किती बदलला?

"म्हापसा-कामुर्ली बस अचानक रद्द केली जाते, याची माझ्याकडे कोणी तक्रार केलेली नाही. मात्र, याविषयी मी अधिकाऱ्यांना विचारतो. लोकांना बससेवा मिळण्यासाठी महामंडळ प्रयत्न करत असताना डेपो प्रमुख लोकांचे हाल करत असतील तर याची गंभीर दखल घेतली जाईल. लोकांना त्रास होईल असा निर्णय अधिकारी कसे घेतात, याची चौकशी करू."

- उल्हास तुयेकर, अध्यक्ष, कदंब महामंडळ

"गेली अनेक वर्षे मी म्हापसा बाजारात भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सकाळी 7 च्या बसने म्हापशात येते व संध्याकाळी शेवटच्या 7.45 च्या बसने कामुर्लीला जाते. अनेकदा ही बस रद्द केल्याने दिवसभरात मिळवलेल्या पैशांतील निम्मे पैसे रिक्षा किंवा मोटरसायकल पायलटच्या भाड्यावरच खर्च होतात. म्हापशातील कदंबच्या काऊंटरवर कोणीही दखल घेत नाही."

- माया हळर्णकर, भाजी विक्रेती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com