Goa Cyber News: सायबर गुन्ह्यांबाबत जागृती करा

Goa Cyber News: शोबित सक्सेना : ‘गुन्हे आणि संवेदनशील’ बाबींवर चर्चा
Goa Crime News |Shobit Saxena
Goa Crime News |Shobit SaxenaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cyber News: पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांना राज्यात काय चालले आहे, याबाबत माहिती मिळते. माध्यमांद्वारे गुन्हेगारी वृत्तांकन करणे गरजचे असून राज्यात प्रामुख्याने सायबर गुन्ह्यांबाबत जागृती करणे गरजेचे आहे, असे मत पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी केले.

ते ‘गुन्हे आणि संवेदनशील बाबींवर मीडिया रिपोर्टिंगवरील प्रभाव’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. व्यासपीठावर शोबित सक्सेना, लौकिक शिलकर, वासुदेव पागी, मुरारी शेट्ये उपस्थित होते. या सत्राचे संचालन पांडुरंग गावकर यांनी केले.

पत्रकार शेट्ये म्हणाले, ज्यावेळी एखाद्या गुन्ह्यात मोठी व्यक्ती, राजकारणी, अभिनय क्षेत्रातील व्यक्ती असेल तर ती बातमी वाचनीय ठरत असते. त्यासाठी नंतर पत्रकाराला माहिती गोळा करण्यास प्रयत्न करावे लागतात. दहा वर्षांपूर्वीच्या एखाद्या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती देणे कितपत योग्य आहे, यावर विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

लौकिक शिलकर म्हणाले, ज्यावेळी गोव्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांची सुरुवात झाली. त्यावेळी आमच्याकडून चुका व्हायच्या, मात्र आता शक्यतो गुन्ह्यांबाबतच्या बातम्या कमी प्रमाणात दाखवतो. अपघात, मृत्यू आदींच्या बातम्या दाखवताना कोणते दृश्य दाखवावे याचे तारतम्य बाळगणे अतिशय गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Goa Crime News |Shobit Saxena
Goa Tourism: गोव्याला जाण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल 50 हजार दंड

प्रामाणिक पत्रकारिता

इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रत्यक्षात घडलेली दृश्य बोलणारी व्यक्ती दाखवताना अधिक सजग असणे गरजेचे आहे. गोव्यातील पत्रकारिता ही प्रामाणिकपणे चालणारी तसेच खरे तेच वार्तांकन करणारी असल्याचा विचारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

माध्यमांवरील एखाद्या वैचारिक चर्चेपेक्षा गुन्हेगारी तसेच अपघाताच्या बातम्या अधिक प्रमाणात वाचल्या जातात, असे का होते? यावर विचार होणे गरजेचे असल्याचे वक्त्यांनी सांगितले. उपस्थितांनीही चर्चेत भाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com