Goa News: मुलाने चीडचीड केली तरी वडिलांना भेटण्याचा अधिकार

Goa News: न भेटण्यासाठीचा आईचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
Court | Goa News
Court | Goa News Dainik Gomantak

Goa News: वडिलांच्या भेटीमुळे मूल जर चीडचीड करत असले तरी वडिलांचा त्याला भेटण्याचा अधिकार कायद्यात आहे. तो रद्द करता येत नाही. वेगवेगळे राहात असलेल्या मुलाच्या आई-वडिलांनी हा प्रश्‍न सोडवण्यासाठी मध्यस्थी समुपदेशन केंद्राची मदत घ्यावी, असे निर्देश देत म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने मुलाच्या वडिलांना भेटण्यास न देण्याची विनंती करणारा आईचा अर्ज फेटाळला.

मुलाचे वडील जेव्हा भेटण्यास किंवा त्याच्याशी संवाद साधण्यासाठी येतात, तेव्हा मूल चीडचीड करते व ते भेटण्यास इच्छुक नसते. त्याच्यावर मानसिक परिणाम होत असल्याचे या मुलाच्या आईने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात नमूद केले होते.

हे मूल वडिलांपासून दूर असल्याने त्याच्यामधील भावना व वागणुकीत काही बदल होणे हे स्वाभाविक आहे. त्याचा स्वभाव आई-वडिलांसोबत असलेल्या मुलांपेक्षा वेगळा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वडिलांना त्याला भेटण्यास न देण्यासाठी मुलाच्या आईने केलेल्या अर्जाला मान्यता देणे योग्य होणार नाही.

हे मूल आईसोबत असल्याने त्याला वडिलांचा सहवास लाभलेला नाही. त्यामुळे ते वडिलांना पाहिल्यावर चीडचीड करण्याची शक्यता आहे. त्यावर वडिलांना भेटू न देणे, हा पर्याय नाही. त्यामुळे पालकांनी एखाद्या मध्यस्थी व्यक्तीच्या साहाय्याने त्यांच्यामधील हा प्रश्‍न सोडवावा.

मुलाला दोघांचाही सहवास मिळेल यावर तोडगा काढल्यास मूलही दोघांसोबत समाधानी राहू शकते, असे निरीक्षण न्यायाधीश तेसी मास्कारेन्हास यांनी नोंदवले आहे.

Court | Goa News
Goa Beach: किनारे गजबजले; गोव्यात कोरोनानंतर पर्यटकांमध्ये मोठी वाढ

समुपदेशकाची मदत घ्या!

मुलाच्या आईने केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळताना त्या मुलाच्या आईवडिलांना पणजीतील मध्यस्थी समुपदेशन केंद्राकडे जाण्याचे निर्देश दिले आहे. मध्यस्थी व्यक्तीने मुलाला भेटण्यास वडिलांना सोयीस्कार व्हावे यासाठी योग्य तोडगा काढावा. या मुलाचे पालक वेगवेगळे राहात असून मूल आईकडे आहे.

मुलाला वडिलांच्या प्रेमाची गरज :

न्यायालयाने 23 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या आदेशात मुलाच्या वडिलांना मुलाला रविवारी सकाळी 10 ते 12 या दरम्यान मुलाच्या आईच्या घरी भेटण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी आईला त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. मूल लहान असल्याने त्याला आईप्रमाणेच वडिलांचेही प्रेम व आपुलकी आवश्‍यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com