Goa Traffic: सायकलींग स्पर्धेमुळे वाहतुकीचे तीन-तेरा

Goa Traffic: ‘नागरिक, प्रवाशांचा खोळंबा : नियोजनाचा अभाव, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
Traffic jams
Traffic jamsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Traffic: ‘आयर्नमॅन 70.3 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे राजधानी पणजीत रविवारी आयोजन करण्यात आले. परंतु या स्पर्धेतील सायकलींग आणि धावण्याच्या प्रकारांमुळे राजधानीत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालेली दिसून आली.

या स्पर्धेच्या मार्गाविषयी ठळकपणे ठिकठिकाणी न लावलेले फलक व पोलिसांची कमतरता यांमुळे वाहतुकीचे तीन-तेरा वाजलेले दिसून आले.

स्पर्धेत 10 किलोमीटर सायकलींग, 1.9 किलोमीटर पोहणे आणि 21.1 कि. मी. धावणे अशा तीन प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेसाठीच्या सरावासाठी दोन दिवस आधीपासूनच देश-विदेशातील स्पर्धक पणजीत दाखल झाले होते.

2019 साली गोव्यात पहिल्यांदा ही स्पर्धा झाली होती. यंदाचे हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा खासदार तेजस्वी सूर्या यांनीही या स्पर्धेत सहभागी होत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

मिरामार ते दयानंद बांदोडकर मार्गावरून मेरशी सर्कल, दोनापावल आणि मिरामार, दिवजा सर्कल ते रायबंदर अशा मार्गाचा वापर यासाठी केला होता. या मार्गावर केवळ लोखंडी बॅरिकेट्स लावले असले तरी, कोणतेही दिशादर्शक फलक लावले नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना कोणता मार्ग कोठून वळविला आहे, हे समजणे अवघड जात होते.

रविवार असल्याने नेहमीप्रमाणे पणजी बाजारात बांदोडकर मार्गावरून जाणाऱ्यां प्रवाशांची पुरती तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मेरशी सर्कलवर वाहतूक पोलिसांना वाहनांची कोंडी सोडविताना नाकीनऊ आली.

पणजीतून म्हापसा-मडगावकडे जाणारा मार्ग, उड्डाण पुलावरून येणारी वाहने, फोंडा, मडगाव, मेरशीतून पणजीकडे येणाऱ्या वाहनांच्या याठिकाणी रांगा पाहायला मिळाल्या. स्पर्धा होणार असल्याने त्याचे मार्ग दर्शविणारे फलक त्या त्या चौकात लावणे आवश्‍यक होते.

पण तसे न केल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे वाहनचालकांनी सांगितले. मेरशीहून आलेल्या वाहनांना पुलाखालील चौकातून पुन्हा सांताक्रूझ येथील उड्डाण पुलाखालून वळून यावे लागत होते.

पोलिसांची उडाली तारांबळ

या स्पर्धेनिमित्त वाहतूक पोलिसांनी मार्गबदलाची आगाऊ सूचना दिली नसल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागले. वाहनचालक नेहमीप्रमाणे रस्त्यावर आले असता अचानक मार्गबदलाची माहिती पोलिस देत होते.

अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस होते. पण वळवलेली वाहतूक कोठे जाते याचा पोलिसांनाही काहीच अंदाज नव्हता. या गैरव्यवस्थापनामुळे मार्केटकडे जाणाऱ्या लोकांची गोची झाली. रविवार असल्याने नेहमीप्रमाणे अनेकजण चारचाकी वाहने घेऊन बाहेर पडले आणि वाहतूक कोंडीत अडकले.

Traffic jams
Dengue Case In Goa: गोव्यात स्थलांतरितांच्या वस्त्या का ठरताहेत डेंग्यूच्या संक्रमणाचे केंद्र?

सेना, पोलिस, सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग

‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ चळवळीअंतर्गत पोलिस, सेनादल, तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या उत्साहाने आयर्नमॅन शर्यतीत शारीरिक तंदुरुस्ती आजमावताना दिसत होते. या स्पर्धेत राजकीय, सामाजिक, तसेच सर्व संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सुमारे 1,500 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

"या स्पर्धेसाठी देश-विदेशातून लोक येतात. त्यांच्या आदरातिथ्याची संधी गोव्यातील जनतेला मिळते. परंतु हे करताना स्थानिकांना त्रास होऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी. आज सकाळी वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांनी माझ्याकडे खंत व्यक्त केली. आयोजकांनी किमान अशा स्पर्धेवेळी वाहतूक वळविण्याविषयी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावणे अपेक्षित होते, तसे दिसून आले नाही."

- सेसील रॉड्रिग्स, आम आदमी पक्ष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com