
Anil Kakodkar: विज्ञान समाजाच्या, राष्ट्राच्या विकासाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्थानिक भाषांमधून विज्ञान तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
ते ‘आव्हान- जागतिक हवामान बदलाचे’ याविषयावर गोवा विद्यापीठात आयोजित केलेल्या 57व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आय.सी.टी. मुंबईचे कुलगुरू अनिरुद्ध जोशी, प्रो. ज्येष्ठराज जोशी, कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन, कुलसचिव प्रो. विष्णू नाडकर्णी, उदय बाळ्ळीकर हे मान्यवर उपस्थित होते.
डॉ. काकोडकर म्हणाले, इ.स. 1700 साली भारताची जी.डी.पी. इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आकलन सर्व भाषांमधून होणे आवश्यक आहे. कार्यक्रमादरम्यान स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
हवामान बदलांकडे दुर्लक्ष नको
हवामान बदलांमुळे दुष्काळ, पाणीटंचाई, सुमद्राची वाढती पातळी व जैवविविधतेतील घट हे आपण गेली कित्येक वर्षे अनुभवतोय. या हवामान बदलांकडे आताच गांभीर्याने पाहिले नाही तर भावी पिढीला खूप त्रासदायक ठरू शकते. पर्यावरण बदल समजून घेऊन धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज आहे.
शैक्षणिक धोरणाला पाठिंबा :
1997 साली पहिल्यांदा गोव्यात आम्ही अधिवेशन घेतले होते. त्यावेळी सर्व कार्यक्रम मराठीत पार पडला होता. मात्र, आता इंग्रजीकडे अधिकाधिक ओढा असल्याचे दिसून येते. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याचे प्राधान्य देण्यात आल्याने आमचा शैक्षणिक धोरणाला पाठिंबा असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी यांनी सांगितले.
राज्यात हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने 50 इलेक्ट्रिक कदंब बस कार्यरत आहेत. 2023 पर्यंत 100 बसेस येतील. राज्यातील विविध भागात चार्जिंग स्टेशनदेखील उभारणार आहोत. त्यासोबतच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी विज्ञान शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.