Goa : भाजपसमोर विरोधकांचे आव्हान!

Goa : राजेश पाटणेकरांना पुन्हा उमेदवारी मिळणार की बदलणार?
Goa : Rajesh Patnekar
Goa : Rajesh PatnekarDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : मगोनंतर आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येणाऱ्या डिचोली मतदारसंघात (Bicholim Constituency) सध्या भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे जाणवत असले, तरी आगामी निवडणुकीत भाजपला मोठा संघर्ष करावा लागणार हे जवळपास स्पष्ट आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. उमेदवार (Candidates) निश्चित झाल्यानंतरच मतदारसंघातील रागरंग स्पष्ट होणार आहे. तरीदेखील सद्यस्थितीत भाजप विरोधी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी (Assembly Planning) सुरू केल्याने यावेळी भाजपची सत्वपरीक्षा ठरणार आहे. त्यातच अपेक्षित विकासकामे होत नसल्याने जनता नाराज आणि मतदारही ‘सायलंट’ आहेत.

Goa : Rajesh Patnekar
देशात पुन्हा भाजपचेच सरकार येणार: नारायण राणे

मगोनंतर भाजपचा बालेकिल्ला
सुरवातीच्या काळात डिचोली मतदारसंघ मगोचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येत होता. गोवा मुक्तीनंतर १९६३ साली झालेल्या प्रथम निवडणुकीपासून १९७७ पर्यंत सलग चार निवडणुकीत या मतदारसंघावर मगोची पकड होती. कालांतराने ही पकड ढिली होत गेली. मध्यंतरी १९८९ आणि १९९९ या साली झालेल्या निवडणुकीत मगोने पुन्हा या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळवले. मात्र नंतरच्या काळात हा मतदारसंघ मगोच्या हातातून निसटला. आता तर या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे.

भाजपची उमेदवारी कोणाला?
आगामी निवडणुकीत भाजप विद्यमान आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांना डावलणार असल्याची चर्चा मागील बऱ्याच महिन्यांपासून चालू आहे. भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून काही नावे चर्चेतही आहेत. मात्र, विरोधकांची मोर्चेबांधणी पाहता, डिचोलीचा बालेकिल्ला शाबूत ठेवायचा असल्यास पाटणेकर यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे काही भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे यावेळीही पाटणेकर हेच निवडणुकीच्या रिंगणात असणार, अशीही चर्चा आता कानी पडत आहे. माजी आमदार नरेश सावळ हे पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुसऱ्या बाजूने डिचोलीच्या राजकारणात एक नवीन चेहरा चर्चेत आहे तो म्हणजे डॉ. चंद्रकांत शेट्ये. कोणत्याही परिस्थितीत डिचोलीतून ते निवडणूक लढविणारच हे स्पष्ट झाले आहे. अपक्ष उमेदवार म्हणून मतदारांना सामोरे जाण्याची त्यांनी तयारी केली आहे. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मेघश्याम राऊत यांचे नाव सध्या तरी आघाडीवर आहे.

घडामोडींची शक्‍यता
निवडणूक जाहीर होईपर्यंत बऱ्याच घडामोडीही घडण्याची शक्यता आहे. भाजप आणि मगो यांच्यात युती झालीच,आणि डिचोलीवर मगोने दावा केलाच, तरी सुरक्षित आणि अनुकूल असलेला हा मतदारसंघ भाजप सोडणार नाही. गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी काँग्रेस या भाजप विरोधी पक्षांची काँग्रेसबरोबर युती झाली तर युतीचा उमेदवार म्हणून भलताच चेहरा पुढे येऊ शकतो. माजी आमदार नरेश सावळ यांनी सध्या तरी अपक्ष उमेदवार या तयारीने आपले कार्य सुरू केले. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच विविध पक्षांचे उमेदवार निश्चित होणार असले, तरी सध्याचे वातावरण पाहता, भाजपला संघर्ष करावा लागणार अशीच चिन्हे दिसत आहेत.

पालिका क्षेत्रातील मतदारांवर मदार
डिचोली मतदारसंघातील उमेदवारांची मदार पालिका क्षेत्रातील मतदारांवर अवलंबून आहे. या मतदारसंघात एकूण २७ हजार ४५१ एवढे मतदार आहेत. पैकी १२ हजार ९६९ मतदार फक्त पालिका क्षेत्रात आहेत. पालिका क्षेत्रात ४० टक्के आणि त्याहून अधिक मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयाची अधिक संधी असते.

मतदारसंघाचा इतिहास
या मतदारसंघात मगोचे प्राबल्य अधिक राहिलेले आहे. १९६३ पासून २०१७ पर्यंत झालेल्या विधानसभेच्या एकूण १३ निवडणुकांपैकी सहा निवडणुकांत या मतदारसंघातून मगो पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तीनवेळा भाजप तर दोनवेळा काँग्रेसने विजय मिळवला आहे. दोनवेळा अपक्ष उमेदवारांनी बाजी मारलेली आहे. डिचोली मतदारसंघातून निवडून आल्यानंतर स्व. शशिकलाताई काकोडकर यांना राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून मान मिळाला. स्व. हरिष झांट्ये, स्व. पांडुरंग भटाळे यांच्यासह पांडुरंग राऊत यांनी मंत्रीपद भूषवलेले आहे. तर विद्यमान आमदार राजेश पाटणेकर हे गोवा विधानसभेचे विद्यमान सभापती आहेत.

*आतापर्यंतचे आमदार*
१९६३ - कुसुमाकर कडकडे (मगोप).
१९६७ -दत्ताराम चोपडेकर (मगोप).
१९७२ -शशिकलाताई काकोडकर (मगोप).
१९७७ -शशिकलाताई काकोडकर (मगोप).
१९८० - हरिष प्रभू झांट्ये (अपक्ष).
१९८४ -हरिष प्रभू झांट्ये (काँग्रेस).
१९८९ -पांडुरंग राऊत (मगोप).
१९९४ -पांडुरंग भटाळे (काँग्रेस).
१९९९ -पांडुरंग राऊत (मगोप).
२००२ -राजेश पाटणेकर (भाजप).
२००७ -राजेश पाटणेकर (भाजप).
२०१२ -नरेश सावळ (अपक्ष).
२०१७ -राजेश पाटणेकर (भाजप).

-------------
निवडणूक निकाल : २०१२
नरेश सावळ ८३३१ मते (अपक्ष).(३९.६८ टक्के)
राजेश पाटणेकर ६५३२ मते (काँग्रेस).(३१.११ टक्के)
मनोहर शिरोडकर ५४११ मते (भाजप).(२५.७७ टक्के)
----------------
निवडणूक निकाल २०१७

राजेश पाटणेकर १०६५४ मते (भाजप).(४५.७१ टक्के)
नरेश सावळ ९९८८ मते (मगो).(४२.३१ टक्के )
मनोहर शिरोडकर १७६१ मते (काँग्रेस) (०७.४५ टक्के)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com