Goa OBC Federation: ओबीसी महासंघातर्फे पाळी येथे मंडल जयंतीनिमित्त जनजागृती

Goa OBC: जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन
Goa OBC: जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन
Goa OBC FederationDainik Gomantak
Published on
Updated on

पाळी: ओबीसी महासंघातर्फे पर्वरी येथे येत्या २५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बिंदेश्‍वरीप्रसाद मंडल जयंतीनिमित्तच्या भव्य कार्यक्रमासंबंधी जनजागृती सध्या जोरात सुरू असून पाळी पंचायतीला यासंबंधीचे निमंत्रण देण्यात आले आहे.

ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी पाळी पंचायतीचे सरपंच संतोष नाईक यांच्याकडे बी. पी. मंडल यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी पंचायतीच्या उपसरपंच तसेच इतर पंचसदस्य व नागरिक उपस्थित होते. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी, असे आवाहन मधू नाईक व इतरांनी केले.

Goa OBC: जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन
Goa OBC Federation: राज्यातील ओबीसी समाजाच्या समस्या राष्ट्रीय पातळीवर मांडल्या; मधु नाईक यांची माहिती

बिंदेश्‍वरीप्रसाद मंडल यांनी ओबीसी समाजासाठी राखीवता देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी पर्वरी येथे येत्या २५ रोजी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाळीतील जागृतीवेळी ओबीसी महासंघाचे एक पदाधिकारी दामोदर नाडर व तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

60 Crore Fee Scam
Cold water during periods myth
Damu Naik NEET Paper Leak
E20 Petrol Mileage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com