Goa Government: खलाशांचे प्रश्न सोडविण्यास तत्पर; ॲड. नरेंद्र सावईकर

Commission for NRI Affairs: ज्या खलाशांना पेन्शन मिळत नाही त्यांना ती मिळावी यासाठी प्रयत्न करणार; आमदार डिकॉस्टा
Commission for NRI Affairs: ज्या खलाशांना पेन्शन मिळत नाही त्यांना ती मिळावी यासाठी प्रयत्न करणार; आमदार डिकॉस्टा
Goa Government Commission for NRI AffairsDainik Gomantak
Published on
Updated on

एनआरआय कमिशनरची कचेरी खलाशांचे विविध प्रश्न सोडविण्यास सदैव तत्पर असते. विदेशात जे भारतीय नागरिक वेगवेगळ्या कारणांमुळे अडकलेले असतात त्यांना परत भारतात आणण्याचे काम ही कचेरी करीत असते.

जर एखाद्याचे विदेशात निधन झाले असेल तर त्याचे शव भारतात आणण्याचे काम ही कचेरी करीत असते, असे एनआरआय कमिशनर अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

गोवन सीमन असोसिएशन ऑफ इंडियाने बुधवारी मडगावच्या रवींद्र भवनात खलाशी दिवस साजरा केला. त्यावेळी सावईकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सन्माननीय अतिथी म्हणून केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष फ्रॅंक व्हिएगश यांनी स्वागत केले. यावेळी खलाशांना सतावणाऱ्या अनेक प्रश्र्नांवर चर्चा झाली.

Commission for NRI Affairs: ज्या खलाशांना पेन्शन मिळत नाही त्यांना ती मिळावी यासाठी प्रयत्न करणार; आमदार डिकॉस्टा
खोल समुद्रात ट्रॉलरवरील भांडणात खलाशाचा खून; दोघे बेपत्ता | Murder of a sailor in the deep sea

पेन्शनसाठी प्रयत्न करणार : ॲल्टन

आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले की, खलाशांचे जीवन समुद्रात धोकादायक असते. त्यामुळे खलाशांनी स्वतःची सुरक्षा राखणे महत्त्वाचे आहे. ज्या खलाशांना पेन्शन मिळत नाही, त्यांना ते मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com