

म्हापसा: प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी मंगळवारी, ध्वनिप्रदूषणाविरोधात कठोर कारवाई करण्यास बजावले असले तरी, नाईट लाइफसाठी प्रसिद्ध वागातोर-हणजूण किनारपट्टीवरील जमिनीवरील वास्तव वेगळेच चित्र दाखवते.
अशावेळी, किमान यापुढे स्थानिकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची मंडळ तसेच पोलिस यंत्रणा किती जातीने लक्ष घालते, याकडे लोकांच्या नजरा आहेत.
गेल्या आठवड्याच्या अखेरीस, विशेषतः रात्रीच्या वेळी, किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये सतत कर्णकर्कश संगीत सुरू होते. यामुळे वारंवार ध्वनिप्रदूषणाची समस्या असलेल्या ठिकाणी बसवलेल्या ‘जीएसपीसीबी’च्या ऑनलाइन ध्वनी निरीक्षण प्रणाली आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अलर्टच्या परिणामकारकतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्थानिक रहिवासी तसेच कार्यकर्त्यांचा आरोप आहेत की, विशेषतः ओझरान आणि हणजूणसारख्या भागांमध्ये रात्रभर चालणाऱ्या ट्रान्स म्युझिक पार्ट्या कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू आहेत, वारंवार तक्रारी करूनही स्थानिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
अजिबात आराम मिळत नाही!
आजकाल ओझरान व हणजूण येथील रात्रभर चालणाऱ्या मोठ्या आवाजाच्या ट्रान्स म्युझिक पार्ट्यांमुळे अजिबात आराम मिळत नाही, असे ध्वनी उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक डेस्मंड अल्वारिस म्हणाले.
‘जीएसपीसीबी’ने रिअल-टाइम देखरेख, सार्वजनिक तक्रार हेल्पलाइन व उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंड यासारख्या अनेक उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी, स्थानिकांचे म्हणणे आहे की जमिनीवर त्यांची अंमलबजावणी कमकुवत आहे व अधिकारी तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.