Goa Nightclub Fire: 'तपास टाळण्यासाठी पळाले'! दिल्ली कोर्टात शाब्दिक लढाई; लुथरा बंधूंच्या जामिनाला गोवा पोलिसांचा तीव्र विरोध

Luthra brothers bail: लुथरा या दोन्ही बंधूंना दिल्लीतील रोहिणी कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळू नये, यासाठी गोवा पोलिसांनी न्यायालयात कठोर भूमिका घेतली
Goa fire case
Goa fire caseDainik Gomantak
Published on
Updated on

Birch nightclub fire case: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमधील भीषण अग्नितांडवामध्ये २५ लोकांचा बळी घेतल्यानंतर भारतातून पळून गेलेल्या मालक सौरभ आणि गौरव लुथरा या दोन्ही बंधूंना दिल्लीतील रोहिणी कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळू नये, यासाठी गोवा पोलिसांनी न्यायालयात कठोर भूमिका घेतली. गुरुवारी (दि.११) झालेल्या सुनावणीत पोलिसांनी त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

'अटक टाळण्यासाठी पळून गेले'

गोवा पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लुथरा बंधूंवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी ठामपणे सांगितले की, या दोघांनी ताबडतोब अटक टाळण्यासाठी आणि सुरू असलेला गुन्हेगारी तपास थांबवण्यासाठीच भारतातून पळ काढला.

आगीनंतर थायलंडमध्ये (फुकेट) पळून गेलेल्या या बंधूंचे थायलंडमध्ये कोणतेही कायदेशीर व्यावसायिक किंवा नोकरीचे संबंध नाहीत. त्यांचा हा अचानक केलेला प्रवास तपासापासून दूर राहण्याचा एक गणलेला प्रयत्न होता. पोलिसांनी आरोप केला की, आरोपी बंधू आता त्यांच्या जामीन अर्जाद्वारे कोर्टाला आणि तपास यंत्रणांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Goa fire case
Goa Nightclub: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर; कळंगुट, बागात जागा मिळेल तेथे क्‍लब, सामान्य नागरिक हैराण!

पीडित' असल्याचा दावा आणि पोलिसांचा विरोध

यापूर्वी, लुथरा बंधूंनी कोर्टात असा अजब दावा केला होता की, आग लागली तेव्हा ते उपस्थित नव्हते आणि ते या घटनेचे 'पीडित' आहेत. त्यांनी व्यवस्थापकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी नमूद केले की, क्लबमध्ये बचावकार्य सुरू असतानाच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या या कृतीमुळेच तपासात अडथळा आणण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू दिसून येतो. गोवा पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य आणि २५ लोकांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडीत चौकशीची आवश्यक असल्याचे कारण दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com