सारझोरा येथे कार आणि रिक्षामध्ये धडक. अपघातात सुरेश चिपान याचा मृत्यू. तर दोघेजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी गोव्यातील कितीतरी लोकांनी गोव्याबाहेर जात प्राणांची आहुती दिली आहे. दुर्दैवाने याची कुठेही नोंद नाही. याची कुठेतरी नोंद व्हायला हवी ज्यामुळे गोव्याचे देशाकडे असलेले दृढ नाते कळून येईल, असे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
हैद्रबादचा ३२ वर्षीय युवक सिरीगम नागराजू याने दाबोळी येथील देवा गोवा हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने टोकाचा निर्णय का घेतला याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिस या घटनेचा शोध घेत आहेत.
पाली सत्तरी येथे नदीत आढळला मतृदेह. मृतदेहाची ओळख पटली असून, तो मूक धानू जानू बोडके यांचा असल्याची माहिती समोर आलीय. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चतुर्थीपूर्वी ४ सप्टेंबर पर्यंत गृहआधार, लाडली लक्ष्मी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार. वित्त खात्याच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती. जीएसटीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री दिल्लीला रवाना.
भाजप गोवा प्रभारी आशिष सूद आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे गोव्यात. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी केले स्वागत.
सरकारने मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये खर्चून राज्यात भूमीगत वीज वाहिन्यांवर भर दिलाय. सरकाराने वीज खात्यात केलेली गुंतवणूक पाहता पुढील 25 वर्षे आणखी गुंतवणूकीची गरज नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचे प्रतिपादन.
पथदिवे दुरुस्तीसाठी 38 स्काय लिफ्ट टॅम्पो तसेच क्रेन्स वीज खात्याच्या ताफ्यात दाखल. 38 टॅम्पो आणि क्रेन्स खरेदीवर 114 कोटींचा खर्च. आणखी 12 स्काय लिफ्ट लवकरच येणार.
आऊटसोर्स केलेल्या या वाहनांची देखभाल (Maintenance) कंत्राटदारच करणार. मुख्यमंत्री सावंत, वीज मंत्री ढवळीकर, आमदार जीत आरोलकर, सीई स्टीफन व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण संपन्न.
नाणूस -वाळपई येथे आज सकाळी आगीत घर पूर्णपणे जळून खाक; शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता; अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान; कोणतीही जीवितहानी झाली
प्रभुनगर - कुर्टी येथे दोन फ्लॅट फोडले. दागिन्यांसह रोकड लंपास. १.९० लाखांचा ऐवज लंपास फोंडा पोलिसांत गुन्हा दाखल.
सहा महिन्यापूर्वी पोलिस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालेल्या वैभव उल्हास नाईक (२३) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दाबोळी - शिरोडा येथे हा प्रकार घडला. वैभव नाईक म्हापसा येथील एस्कॉर्ट जीपवर कार्यरत होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.