
उसगांवातील 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने मोठा झटका दिला. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कर्नाटक मायनिंग घोटाळ्याप्रकरणी मंत्री रोहन खंवटेंना लोकायुक्त कोर्टाने दिलासा दिला. खवंटेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मये-वायंगिणी पंचायतीच्या उपसरपंचपदी वर्षा गडेकर यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी (7 मार्च) ही निवडणूक पार पडली.
कळंगुट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अॅनी कोएल्हो यांची शुक्रवारी (7 मार्च) बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच गीता परब यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
आरोपी पप्पू आणि पूजा दोघांनी मिळून आपल्या 5 वर्षीय मुलीला पाण्यात बुडवून मारले असून दोघांना कठोर शिक्षा देण्याची मागणी मृत मुलीच्या आईने केली.
उसगांवतील 5 वर्षीय मुलीची हत्या ही अत्यंत दुखद घटना असून आमदार म्हणून मी डीजीपींना पत्र लिहिले आहे. तसेच, या घटनेतील गुन्हेगार अजिबात सुटणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनीही याप्रकरणात लक्ष घातले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
केपे येथून सेंट फ्रान्सिस झेवियरच्या मूर्तीच्या चोरीची घटना समोर आली आहे. अमोना येथील सेंट फ्रान्सिस कॉलनीतील घर क्रमांक 171 येथून ही मूर्ती चोरीला गेल्याचे समोर आले आहे. केपे पोलिसांनी या चोरीच्या घटनेसंबंधी तक्रार नोंदवली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांत पुन्हा हिट अॅण्ड रनच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातच, बस्तोरा येथून अशीच एक घटना समोर आली. तारा जंक्शन येथील हिट अॅण्ड रनच्या घटनेमध्ये वडिलांसह मुलगा गंभीर जखमी झाला.
उसगांव, अवंतीनगर येथील बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी सुखरुप घरी परतली.
बोरीमळ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कार्यालयाची गेल्या वर्षभरपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे दुर्दशा पाहायला मिळत आहे. कार्यालयात भिंतींना भल्या मोठ्या भेगा, तुटलेल्या फरशा आणि नादुरुस्त पंखे दिसून येत आहेत. कार्यालयाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
आमोणे पुलावरून उडी मारलेल्या महिलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आलाय.
जांबवली देवस्थान समिती निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मामलेदार कार्यालय, सांगे येथे सुरू आहे. १ मार्च रोजी उच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे.
"यापुढे खासगी नोकरीच्या अनुभव प्रमाणपत्राशिवाय सरकारी नोकरी मिळणार नाही. केंद्र सरकारच्या प्रशिक्षणार्थी योजनेत नवयुवकांनी भरती होऊन एक वर्षाचे प्रमाणपत्र मिळवावे. गोव्यात राबविलेल्या एपरेंटिशीप योजनेचा २० ते २५ हजार लोकांनी लाभ घेतला" - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
उसगांव अवंतीनगर येथील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी फोंडा पोलिसात तक्रारीची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.