New Zuari Bridge Accident: 'बाणास्तरी' नंतर 'झुआरी'वर भीषण अपघात, कार चालकासह दोन प्रवासी गंभीर

कारचा वेग इतका होता की ही कार उड्डाणपुलाच्या खोर्लीला जाणाऱ्या लेनच्या बाजूच्या विजेच्या खांबाला धडकली
New Zuari Bridge Accident
New Zuari Bridge AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

New Zuari Bridge Accident राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र वाढतच चालले आहे. आज बुधवारी नवीन झुआरी पुलावर एका प्रवासी कारचा भीषण अपघात झाला असून चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

कारचा वेग इतका होता की ही कार उड्डाणपुलाच्या खोर्लीला जाणाऱ्या लेनच्या बाजूच्या विजेच्या खांबाला धडकली आणि त्यानंतर ती उलटली. या घटनेत कार चालक आणि दोन प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

New Zuari Bridge Accident
Bharat Gaurav Tourist Train: गोव्याला येणार भारत गौरव टुरिस्ट ट्रेन; 28 सप्टेंबरला मदुराईतून सुटणार...

कारची धडक एवढी जबरदस्त होती की या धडकेने विजेचा खांब मधोमध वाकून तुटला. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान कारमधून प्रवास करणाऱ्यांबद्दल सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झाली नाहीय तसेच चालकाने मद्य प्राशन केले होते का? याबाबतही कोणतीही माहिती मिळाली नाहीय.

अवघ्या महिन्याभरापूर्वी राज्याला हादरवून टाकणाऱ्या बाणास्तरी पुलावरील अपघातानंतर वेगवान वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले होते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेमार्फत शहरात तसेच संभाव्य अपघातग्रस्त ठिकाणी cctv कॅमेरा लावण्यात आले आहेत.

मात्र असे असूनही अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे या झुआरी अपघातानंतर पुन्हा एकदा स्पष्ट होतंय.

New Zuari Bridge Accident
Worms In Mid Day Meal: 'माध्यान्ह आहार' प्रकरणाची CM कडून दखल; 'हलगर्जीपणावर कठोर कारवाई करणार...'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com