गोव्यात 'थर्टी फर्स्ट'चा जल्लोष! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'हे' आहेत सर्वोत्तम पार्टी डेस्टिनेशन्स

31st Night Celebration Goa: गोव्यात नवीन वर्षाची संध्याकाळ ही केवळ एका रात्रीची पार्टी नसते, तर ती रात्रभर चालणारी एक उत्साहाची लाट असते.
Goa New Year Party 2026
Goa New Year Party 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

best new year party places in goa: गोव्यात नवीन वर्षाची संध्याकाळ ही केवळ एका रात्रीची पार्टी नसते, तर ती रात्रभर चालणारी एक उत्साहाची लाट असते. लोक समुद्रकिनाऱ्यांपासून क्लब्सपर्यंत आणि सूर्यास्ताच्या सुखद संगीतापासून ते पहाटेच्या 'सनराइज'पर्यंत संगीताचा पाठलाग करत फिरत असतात. इतर शहरांपेक्षा गोव्यातील 'थर्टी फर्स्ट' अधिक मोठा, अधिक गोंगाटाचा असतो. हेच पर्यटकांना गोव्याकडे खेचून आणते.

नियोजन करा आणि 'ट्रॅफिक'वर मात करा

गोव्यात ३१ डिसेंबरला मज्जा करायची असेल, तर सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे 'लवकर नियोजन'. येथील समुद्रकिनारी होणाऱ्या पार्ट्यांची तिकिटे सर्वात आधी संपतात. क्लबमधील नाईट्समध्ये आंतरराष्ट्रीय डीजे आणि हाय-प्रोफाईल निर्मितीवर भर दिला जातो. या दिवशी गोव्यातील वाहतूक कोंडी तुमची योजना बिघडवू शकते, त्यामुळे तुम्ही कुठे जाणार आहात हे आधीच निश्चित करणे शहाणपणाचे ठरेल.

Goa New Year Party 2026
New Year Resolutions: आनंदी रहायचं आहे? मग नवीन वर्षासाठी 'हे' संकल्प करा..

संगीताचा महाकुंभ: हिल्टॉप

ज्यांना केवळ संगीतासाठी गोव्यात यायचे आहे, त्यांना वागातोर येथे होणाऱ्या या पार्टीत आंतरराष्ट्रीय डीजे, भव्य स्टेज आणि फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळेल. दुसरीकडे, ज्यांना ट्रान्स म्युझिक आणि पहाटेपर्यंत डान्स करायची आवड आहे, त्यांच्यासाठी 'हिल्टॉप' हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे मध्यरात्रीपेक्षा पहाटेच्या उजेडात नाचणाऱ्यांची संख्या अधिक असते.

क्लासिक गोवा अनुभव: टिटोस आणि क्लब क्युबाना

बागा बीचवरील 'टिटोस' म्हणजे गोव्यातील सेलिब्रेशनचा पारंपरिक कणा. येथे लोकांची प्रचंड गर्दी, कानठळ्या बसवणारे संगीत आणि कॉन्फेटीच्या वर्षावात होणारे काउंटडाउन अनुभवायला मिळते. हडफडे येथील 'क्लब क्युबाना'मध्ये तुम्हाला लेझर लाईट्स आणि उंचावरून दिसणाऱ्या विलोभनीय दृश्यांसह डान्स फ्लोअरवर थिरकता येईल. हे ठिकाण तरुण पर्यटकांच्या विशेष पसंतीचे आहे.

शांतता आणि लक्झरी: थालासा आणि पंचतारांकित हॉटेल्स

ज्यांना क्लबमधील गोंधळापेक्षा समुद्राच्या लाटांच्या आवाजात शांतपणे सेलिब्रेशन करायचे आहे, त्यांच्यासाठी शिवोलीमधील 'थालासा' उत्तम आहे. येथे रात्रीचे जेवण, ड्रिंक्स आणि पाण्याचा काठावर होणारी फटाक्यांची आतषबाजी मनाला भुरळ घालते. याशिवाय, वागातोर येथील 'डब्लू गोवा' किंवा कांदोळीमधील 'ताज फोर्ट आग्वाद' सारख्या ठिकाणी लक्झरी डिनरचे आयोजन केले जाते. जिथे सुरक्षितता, उत्तम जेवण आणि लाईव्ह परफॉर्मन्सची मेजवानी मिळते.

हणजूणची जादू

हणजूण बीचवरील 'कर्लीज' येथे होणारी पार्टी म्हणजे अस्सल गोवन फील! येथे वेळापत्रकाची काळजी कुणीही करत नाही. अनवाणी पायांनी वाळूत नाचणे आणि समुद्राच्या गाजेसोबत नवीन वर्षाचे स्वागत करणे ही एक वेगळीच अनुभूती असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com