Panaji News : पणजी, ‘इएचव्ही इंटरनॅशनल’ आस्थापनाने चोखंदळ खवय्यांसाठी गोव्यात आता शिवोली - बार्देश येथे नदीकाठी रमणीय परिसरात विविध लज्जतदार खाद्य पदार्थ उपलब्ध करणारे थाई रेस्टॉरंट सादर केले आहे.
‘सियामीज फायरबॅक’ हा थाई राष्ट्रीय पक्षी असून त्यापासून प्रेरणा घेतलेले हे रेस्टॉरंट आहे. ‘इएचव्ही’च्या आस्थापनांपैकी हे सर्वात नवीन रेस्टॉरंट आहे.
फायरबॅक या नावामागे आगीच्या ज्वालांनी पदार्थ तयार करण्याची पार्श्वभूमीही आहे. या क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त केलेले शेफ डेव्हिड थॉम्पसन हे या सुप्रसिध्द रेस्टॉरंटचे कलिनरी संचालक आहेत.
चेअरमन रोहित खट्टर म्हणाले की आपल्याला थॉम्पसन यांच्या कौशल्याने भुरळ पाडली होती आणि आता गोव्यातील या रेस्टॉरंटमध्ये ते असल्याबद्दल अतिशय आनंदीत झालो आहे. कुशल शेफ टिममध्ये एकूण ७ तरबेज शेफ्स आहेत.
त्यांचे नेतृत्व शेफ स्वतंत्र गौतम हे करतात. सातहीजणांच्या या टिमला बँकॉकमध्ये सर्व प्रकारचे थाई पाककलेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेफ स्वतंत्र गौतम आशियाई पाककला क्षेत्रातील २० वर्षांचा अनुभव आहे. प्रांतुश राय हे प्रमुख शेफ आहेत आणि कमल कांत जोशी हे शेफ द कुईजिन आहेत. केविन रॉड्रिग्स हे वाईन प्रमुख आहेत.
तत्पर आणि अदबशीर सेवा
फायरबॅकच्या मेनूमधील पाककृती तथा खाद्य पदार्थ अस्सल थाई असून पारंपरीक आणि आधुनिक यांचा मिलाफ या पदार्थांमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या रेस्टॉरंटमधील सेवा तत्पर आणि अदबशीर अशी आहे.
पदार्थांमध्ये जॉस्पर ग्रील हा केंद्रबिंदू आहे. ग्रील्स आणि स्क्यवर्स यांचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. त्यात टरमेरिक प्राऊन्स, दक्षिणी शैलीचे पम्पकीन, ऑम्लेटस्ची मालिका, पोमेलोचे सॅलड, टोस्टेड नारळ, श्रेडेड जिंजर, स्मोकी ग्रील्ड एगप्लांट गोरली आणि बरेच काही यांचा समावेश आहे.
आधुनिक ग्लास हाऊस
हे रेस्टाॅरंट म्हणजे एक आधुनिक ग्लास हाऊस आहे आणि त्याचा पोमेनेड नदीला सन्मुख असा आहे. त्याला आकर्षक अशा सेंट अँथनी चर्चची रमणीय पार्श्वभूमी लाभली आहे. आऊटडोअर आणि ईनडोअर मिळून ८० जणांसाठी येथे आसन व्यवस्था आहे. रश्मी खट्टर यांनी त्यासाठी समन्वयकाची भूमिका बजावली आहे.
आर्किटेक्ट प्रताप नाईक यांनी विकास भसिन यांच्यासमवेत ग्लास हाऊस साकारण्याची जबाबदारी घेतली आहे. लंचः दु. १२ ते ३.३०. बार बाईटस् आणि ड्रिंक्स ः संध्या. ४ ते ७ वाजेपर्यंत डिनरः संध्या. ७ रात्री ११ वाजेपर्यंत. येथे उत्तम अशी पार्किंग व्यवस्था आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.