Goa: रात्री 10नंतर म्युझिक बंदी; पर्यटन व्यवसायाच्या येणार मुळावर

Goa: व्यावसायिकांकडून कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
Night music
Night musicDainik Gomantak

Goa: रात्री10 वाजेपर्यंतच संगीत वाजविता येते ही जी सक्ती केली आहे, ती गोव्यातील पर्यटन व्यवसायाच्या मुळावर येणारी असून ही अट शिथिल करून रात्री किमान 11वाजेपर्यंत संगीत वाजविण्याची परवानगी देण्याची गरज दक्षिण गोव्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांनी केली आहे.

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी या व्यावसायिकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावून उच्च न्यायालयाने जी संगीत वाजविण्याबद्दल सूचना केली आहे त्याची कल्पना देताना, रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकावर संगीत वाजविल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

Night music
Gajanan Sawant Attack: मुंबई HC ची गोवा सरकारला नोटीस, 6 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लहान हॉटेलचालक संघटनेचे उपाध्यक्ष आणि ओर्लीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी सध्या ख्रिसमस मोसम सुरू झाला असून गोव्यात पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. पर्यटक गोव्यात मजा करण्यासाठी येत असतात अशा स्थितीत रात्री 10 वाजता संगीत वाजविणे बंद केल्यास पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

‘निर्बंध शिथिल करा’

रात्री दहानंतर संगीताचा वापर करण्यास बंदी असणारा कायदा असल्याने प्रशासनावर त्याची अंमलबजावणी करणे सक्तीचे आहे ही गोष्ट खरी असली, तरी विधानसभेत नवा कायदा संमत करून हे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी लहान हॉटेलचालक संघटनेचे उपाध्यक्ष आणि ओर्लीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com